शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरापासून मालमत्ता मोजणीला सुरुवात

By admin | Updated: June 2, 2015 02:11 IST

महापालिकेची पूर्व झोनमध्ये मोहीम ; नगरसेवकांच्या घरांचेही मोजमाप.

अकोला: महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तेचे नव्याने करनिर्धारण करण्यासाठी मनपा प्रशासनाच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली असून, मोहिमेंतर्गत सोमवारी गृह व नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जठारपेठेतील घराचीही मोजणी करण्यात आली. मोजणीसाठी महापालिकेच्या विशेष पथकाला पाटील कुटुंबीयांना सहकार्य केले. गत काही दिवसांपासून शहरामध्ये मालमत्ता मोजमापाचे काम सुरू आहे. सोमवारी मनपाच्या विशेष पथकाने उपायुक्त माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनात पूर्व झोनमध्ये मोजमाप करण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम जठारपेठेत राहणारे गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानापासून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे पथकाने जाऊन त्यांच्या निवासस्थानाचे मोजमाप केले. त्यानंतर विशेष पथकाने नगरसेवक विजय अग्रवाल, नगरसेवक गीतांजली शेगोकार, नगरसेवक बबलू जगताप यांच्याही घरांचे मोजमाप केले. त्यानंतर मनपा विशेष पथकाने पूर्व झोनमधील नागरिकांच्या घरांचे मोजमाप करण्याची मोहीम हाती घेतली. आता जवळपास आठवडाभर पूर्व झोनमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. मोजमापाच्या वेळी पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कनिष्ठ अभियंता नंदलाल मेश्राम, कर अधीक्षक विजय पारतवार, उस्मानभाई, सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण, नंदकिशोर उजवणे उपस्थित होते