शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

न्यू तापडिया नगरमधील उड्डाण पुलाच्या कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:43 IST

खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण भागात जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग पार करून जावे लागत होते. रेल्वेगाड्यांमुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी क ोंडी निर्माण होत असल्याने उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली होती. खासदार संजय धोत्रे यांचे प्रयत्न व आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटी रुपये प्राप्त होऊन उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोला ते गायगाव मार्गावरील डाबकी रोड येथील उड्डाण पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. याच धर्तीवर न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी भागात जाण्यासाठी सातव चौकानजीकच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ उड्डाण पुलाचे निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत असल्याने घुसर, आपातापा आदींसह इतर ग्रामीण भागातील नागरिकांना अकोट फैल मार्गे शहरात प्रवेश करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता खासदार संजय धोत्रे यांनी मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे प्रशासनासोबत संपर्क साधून उड्डाण पुलासाठी आराखडा तयार करून घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली असता, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ५० कोटींचा निधी प्राप्त झाला. उड्डाण पुलाच्या बांधकामात येणाºया संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यानंतर उड्डाण पुलाची निविदा प्रकाशित करण्यात आली.७८८ मीटर लांबीच्या कामाला प्रारंभउड्डाण पुलाच्या कामाला सातव चौकापासून सुरुवात झाली आहे. पुलाची एकूण लांबी ३२५ मीटर असून, त्यावर ४३३ मीटर अंतराच्या प्रशस्त रस्त्याचे निर्माण होणार आहे. या कामासाठी नांदेड येथील शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेRandhir Savarkarरणधीर सावरकर