शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची मोजणी सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:46 IST

अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश विमानतळावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले.अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात विमानतळावर बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार गोपीकिशन बाजोरिया, भारतीय विमान पत्तन प्राधिकरणचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्देशक साहू व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अकोल्याच्या शिवणी विमानतळाची धावपट्टी सध्या १ हजार ४00 मीटर लांबी व ४५ मीटर रुंदीची आहे. विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीची लांबी १ हजार ८00  मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0 हेक्टर ६८ आर जमीन  शासन आदेशानुसार संपादन करण्यात आली असून, ही जमीन गत २३ मे २0१६ रोजी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या ताब्यात देण्यात आली आहे. तसेच ३४ हेक्टर 0६ आर खासगी जमीन संपादन करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळावर एटीआर -४२ प्रकारची विमाने उतरण्यासाठी खासगी जमीन संपादन केल्याशिवाय विमानतळाचा विकास शक्य नसल्याचे भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या नागपूर येथील विमानतळाचे निर्देशक साहू यांनी यावेळी सांगितले. विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनाकरिता जमिनीची मोजणी करण्यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनामार्फत गत १५ मार्च २0१७ रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जमीन मोजणीसाठी १८ लाख १५ हजार रुपयांचा भरणा भूमी अभिलेख विभागाच्या अकोला उप अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आला आहे. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. तसेच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आवश्यक प्रशासकीय आदेश व निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAirportविमानतळ