शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटप सुरू; कपाशीला एकरी २१ हजारांचे पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:49 IST

कोरडवाहू बीटीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.

अकोला: या खरीप हंगामासाठी बँकांचे पीक कर्ज जाहीर झाले. अकोला जिल्ह्यात बागायती बीटी कपाशी लागवडीसाठी एकरी २१ हजार २00 रुपये कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरडवाहू बीटीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे नियोजन करण्यात आले असून, प्रशासनाने बँकांना यासाठीच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या पिकांची पेरणी सर्वात जास्त केली जाते. ओलिताच्या कपाशी लागवडीसाठी हेक्टरी ५३ हजार रुपये देण्यात येणार आहेत, म्हणजे एकरी २१ हजार २०० रुपये हे कपाशीसाठीच्या पीक कर्जाचे प्रमाण आहे. सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सोयाबीनला एकरी १८ हजार रुपये आहे. तूर पीक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, या पिकाला हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये कर्ज मिळणार आहे. गतवर्षी ज्वारीचे पीक घेतले. यावर्षी खरीप ज्वारीला हेक्टरी २६ हजार रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे. सूर्यफूल या पिकाला २६ हजार २०० रुपये असे सर्व खरीप हंगामातील पिकांचे दर निश्चित करण्यात आले. हे सर्व बागायती पिकांचे दर असून, कोरडवाहू पिकासाठी दर निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये कोरडवाहू बीटी कपाशीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये, संकरित ज्वारी २५ हजार रुपये, तूर पिकाला ३१ हजार ५०० रुपये, मूग आणि उडीद या पिकाला १९ हजार रुपये, तीळ पिकाला २३ हजार रुपये दिले जाणार आहे. जिल्ह्यात ओवा पीक घेण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून, खारपाणपट्ट्यातील शेतकरी ओवा पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. याच अनुषंगाने यावर्षी ओवा पिकासाठी हेक्टरी १७ हजार रुपये कर्ज मिळणार आहे.बागायती पिकांतील मिरचीला ७५ हजार ३०० रुपये केळी या पिकासाठी ९३ हजार ५०० रुपये कर्ज मिळणार आहे. हळद पिकालाही कर्ज मिळणार आहे. पपई ७० हजार, डाळिंब १ लाख २१ हजार, बटाटा पिकाला ७३ हजार कर्ज मिळेल.रब्बी पिकाचाही दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये कोरडवाहू हरभºयाची २४ हजार, गहू ३५ हजार, करडई २७ हजार, कांदा ७३ हजार तर उन्हाळी भुईमूग पिकाला ३८ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जAkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी