शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी भरती, आरक्षण, अनुशेषाचा समिती घेणार धांडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:27 IST

अकोला : शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जातींच्या कर्मचार्‍यांची भरती, आरक्षण, पदोन्नती, अनुशेषाबाबतच्या संपूर्ण माहितीचा धांडोळा घेत त्यातील त्रुटी, अनियमिततेप्रकरणी विधिमंडळाला अहवाल सादर करण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समिती १0, ११ व १२ जानेवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. यावेळी समितीचा विभागांना भेटी देण्याचा कार्यक्रमही ठरला आहे.

ठळक मुद्देअनुसूचित जाती कल्याण समितीचा तीन दिवस दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जातींच्या कर्मचार्‍यांची भरती, आरक्षण, पदोन्नती, अनुशेषाबाबतच्या संपूर्ण माहितीचा धांडोळा घेत त्यातील त्रुटी, अनियमिततेप्रकरणी विधिमंडळाला अहवाल सादर करण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समिती १0, ११ व १२ जानेवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. यावेळी समितीचा विभागांना भेटी देण्याचा कार्यक्रमही ठरला आहे.विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह १३ सदस्यांचा समावेश आहे. समितीच्या दोन दिवस दौर्‍यात विविध शासकीय कार्यालये, समाजकल्याण विभागाच्या शाळा, वसतिगृहांनाही भेटी दिल्या जाणार आहेत. कार्यालयांमध्ये झालेली कर्मचारी भरती, त्यातील आरक्षणाचे प्रमाण, पदोन्नती, जात पडताळणी, अनुशेष भरती प्रक्रियेतील संपूर्ण माहितीची पडताळणी समितीकडून केली जाणार आहे. त्यामध्ये झालेली अनियमितता, त्रुटींचा अहवाल विधिमंडळाला सादर केला जाणार आहे. त्याशिवाय, समाजकल्याण विभागाकडून चालवले जाणारे वसतिगृह, शाळांना समिती भेट देणार आहे. त्यामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मिळणार्‍या सोयीसुविधांची माहिती घेतली जाणार आहे.  समितीच्या या नियोजित दौर्‍यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. 

या कार्यालयांची घेणार माहितीसमितीच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात १0 जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. त्यानंतर कामकाजाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. त्यामध्ये दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नगर पालिका प्रशासनाकडून ठरलेल्या मुद्यांच्या माहितीसोबतच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणार्‍या योजनांबाबत चर्चा होईल. त्यानंतर क्रमाने पोलीस अधीक्षक कार्यालय, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय, महानगरपालिकेचा आढावा घेतला जाईल. दुपारी ३.३0 वाजता जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कर्मचारीविषयक, प्रकल्प कार्यालयांतर्गत मागासवर्गीय क्षेत्रात जिल्हा परिषद यंत्रणांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. सायंकाळी ५.३0 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आढावा विद्यापीठात घेतला जाईल. दुसर्‍या दिवशी ११ जानेवारी रोजी दुपारी जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय अनुदानित शाळा, वसतिगृह, तसेच शासन, जिल्हा परिषद यंत्रणांकडून केलेल्या योजनांच्या कामांना भेटी दिल्या जाणार आहेत. तिसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता पहिल्या दिवशी झालेल्या विविध विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. दुपारी २ वाजेनंतर बैठक संपणार आहे. 

समितीमध्ये १३ आमदार सदस्यविधिमंडळाच्या या समितीमध्ये अध्यक्ष आमदार पिंपळे यांच्यासह सर्व आमदार लखन मलिक, डॉ. मिलिंद माने, राजू तोडसाम, प्रा. संगीता ठोंबरे, ज्ञानराज चौगुले, अहिरे, संध्यादेवी देसाई, प्रा. वर्षा गायकवाड, भाई गिरकर, प्रकाश गजभिये, प्रा.जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील यांच्यासह उपसचिव ना.रा. थिटे, अवर सचिव आनंद राहाटे उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर