शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ST Workers: सदावर्तेंची क्रेझ उतरली, ST कामगारांनीच जाळल्या संघटनेच्या पावत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 19:21 IST

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता. त्यावरुन, विपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुणरत्न सदावर्तेना टोला लगावला होता.

अकोला - राज्यातील एसटी कामगारांच्या पगारावरुन काही दिवसांपूर्वी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, महाविकास आघाडी सरकार काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा संप केला होता. त्यावेळी, कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते हे डंके की चोट पे म्हणत आंदोलनात मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कामगारांचे नेते म्हणूनही ते वागत होते. एसटी कामगार संघटनेचीही त्यांनी स्थापना केली होती. मात्र, आता कामगारांनीच गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेच्या पावत्या जाळल्या आहेत. 

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नव्हता. त्यावरुन, विपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुणरत्न सदावर्तेना टोला लगावला होता. डंके की चोटवाला कुठं गेला, कुठं गेला डंका आणि कुठं गेली चोट, असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता. तर, आता गुणरत्न सदावर्ते यांच्या कामगारांनीच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी गुणवंत सदावर्ते यांच्या एस.टी.कष्टकरी जनसंघटनेच्या पावत्या जाळून गुणवंत सदावर्ते यांचा निषेध व्यक्त केला. 

एकेकाळी सर्व इष्ट कर्मचाऱ्यांनी गुणवंत सदावर्ते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य केले. पण, आज तोच एसटी कर्मचारी गुणवंत सदावर्तेंविरोधात गेला. कारण, आंदोलनावेळी केलेलं एकही आश्वासन आजपर्यंत पुरे झालेलं नाही. त्यामुळे नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आगार क्रमांक दोनच्या गेट समोर संघटनेच्या पावत्या जाळून सदावर्ते यांच्या बदललेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेAkolaअकोला