बाळापूर (जि. अकोला) : एसटी बसने ट्रकला धडक दिल्याची घटना बाळापूर तालुक्यातील रिधारोनजीक घडली. या अपघातात बसचे वाहक रवींद्रसिंह उमेदसिंह किल्लेदार (वय ४0, रा. मलकापूर, ता. जि. अकोला) हे मृत्युमुखी पडले असून, १0 प्रवासी जखमी झाले. अपघातामुळे काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरानजीक एमएच-१४- बीटी-५0२२ या पुणे-नागपूर निमआराम एसटी बसने जीजे-२५-यू-३३४१ या क्रमाकांच्या ट्रकला मागील बाजूने धडक दिली. या धडकेत वाहक रवींद्रसिह उमेदसिंह किल्लेदार हे जबर जखमी झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातात १0 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एसटीची ट्रकला धडक; वाहक ठार
By admin | Updated: April 5, 2016 01:51 IST