शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

अकोल्यात रोवली गेली श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ!

By admin | Updated: April 30, 2015 01:52 IST

१९४३ मधील चतुर्मासात अकोल्यात होता राष्ट्रसंतांचा मुक्काम.

नितीन गव्हाळे /अकोला : अकोलेकर आणि तुकडोजी महाराज यांचे जुने नाते. त्यांच्यासोबत घालविलेले काही दिवस, काही क्षणांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेकजण अकोला जिल्हय़ात आहेत. त्याचे कारणही तसेच आहे, चार दिवस नव्हेतर तब्बल चार महिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अकोल्यातील राजराजेश्‍वर मंदिरात वास्तव्य केले. त्यांच्या सहवासातच राष्ट्रसंतांच्या शिष्यांनी अकोल्यातच श्री गुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना अकोल्यात झाली. याचे कोणालाही नवल वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली (जि.अमरावती), माणिकदेव बंडूजी इंगळे हे त्यांचे नाव. त्यांची जन्मभूमी यावली असली तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ होती. खंजिरी भजनातून त्यांनी विदर्भातील सर्वच जिल्हय़ात भ्रमंती करून समाजात प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित केली. अकोल्याशी तर त्यांचा विशेष ऋणानुबंध होता. १९४३ मधील चतरुमासात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अकोल्यात आले होते. याठिकाणी त्यांना व त्यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग होता, तो आजही आहे. अकोल्यातील राजराजेश्‍वर मंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक शिबिर घेतले. तब्बल चार महिने त्यांनी मंदिरात वास्तव्य करून खंजिरीच्या माध्यमातून अकोलेकरांचे प्रबोधन केले. अकोल्यात त्यांचे स्व. ओंकारराव मुंडगावकर, रामदास काळे, किसनलाल गोयनका, पांडुरंग भिरड, ह.भ.प आमले महाराज, सुधाताई जवंजाळ, अँड. रामसिंग राजपूत हे पट्टशिष्य होत. स्व. ओंकारराव मुंडगावकरांकडे त्यांचे नेहमीच येणे-जाणे होत असे. आपल्या शिष्यांना घेऊन ते अकोला जिल्हय़ातील प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्राम जागृती करीत. समाजप्रबोधन करीत. अकोल्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चार महिन्यांच्या वास्तव्यामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापनेचा विचार समोर आला. महाराजांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली. अभिमानाची बाब ही की, राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित सेवा मंडळाची सुरुवातच अकोल्यातून झाली. त्यामुळेच अकोला जिल्हय़ातील प्रत्येक घरा तील व्यक्ती राष्ट्रसंतांच्या विचारांशी, ग्रामगीतेशी समरस झाली. *चार महिन्यांच्या वास्तव्यात जय हिंद चौकात व्हायचे भजनराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अकोल्यात चार महिने वास्तव्य केले. कधी राजराजेश्‍वर मंदिर तर कधी सावतराम मिल परिसरात त्यांचे वास्तव्य असायचे. यादरम्यान त्यांचे जय हिंद चौकामध्ये भजन व्हायचे. हजारो अकोलेकरांची त्यांचे भजन ऐकण्यासाठी गर्दी जमायची.