शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावाच्या निकृष्ट बांधकामाकडे क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 14:38 IST

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे संपूर्ण शहरासाठी एकमेव जलतरण आहे; परंतु जलतरण तलावातील टाइल्स अनेक ठिकाणी फुटलेल्या व तुटलेल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येत आहे.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे संपूर्ण शहरासाठी एकमेव जलतरण आहे; परंतु जलतरण तलावातील टाइल्स अनेक ठिकाणी फुटलेल्या व तुटलेल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येत आहे. याकडे कर्तव्यदक्ष समजले जाणारे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.जलतरण तलावाचे कार्य हे जलदगतीने करून जलतरणपटूंना जलतरण तलाव लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या जलतरण तलावात बसून युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बुढन गाडेकर यांनी सांगितले आहे.दुरुस्तीच्या नावाखाली तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेला शहरातील एकमेव तरण तलाव उन्हाळ्याची चाहूल लागली तरीसुद्धा सुरू करण्यात आलेला नाही. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलतरण तलाव १ मार्च रोजी सुरू होणार, अशी ग्वाही आसाराम जाधव यांनी हौशी जलतरणपटूंनी तक्रार केल्यानंतर दिली होती. मार्चचा एक आठवडा उलटूनही तरणतलाव अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. थातूरमातूर टाइल्स बदलविण्याचे काम सुरू आहे. तेदेखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. टाइल्स अशा पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत, की चावीसारख्या छोट्या वस्तूनेही या टाइल्स उखडल्या जातील. दुरुस्तीचे काम सुरू असताना जिल्हा क्रीडा संकुल समिती किंवा क्रीडा विभागाच्या एकाही कर्मचाऱ्याला या दुरुस्ती कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने येथे काम करणारे मजूर दुरुस्तीचे काम करीत आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSwimmingपोहणे