शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

क्रीडा स्पर्धा : अकोला तालुका हॅट्ट्रिकसह चॅम्पियन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:28 PM

अकोला तालुक्याला सलग तीन वर्ष सामूहिक विजेतेपद तर मिळून दिलेच त्याचबरोबर हॅट्ट्रिकसुद्धा साधली.

अकोला : अकोला जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या खेळ व क्रीडा स्पर्धेत अकोला तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाच्या खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करून अकोला तालुक्याला सलग तीन वर्ष सामूहिक विजेतेपद तर मिळून दिलेच त्याचबरोबर हॅट्ट्रिकसुद्धा साधली. विशेष म्हणजे सलग ३ वर्ष चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळून देण्यामागे सर्वच अधिकारी व खेळाडू यांचा मोलाचा वाटा उचलला.वसंत देसाई क्रीडांगण येथे १७ ते १९ जानेवारीदरम्यान आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सात तालुके तथा मुख्यालयाचा एक संघ असे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. सर्व तालुक्यांना लॉट्स पाडून आपसात खेळविण्यात आले. बॅडमिंटन खुला गट व बॅडमिंटन या प्रकारात अकोल्याचा वरचष्मा राहिला. अकोल्याचे राजीव गरकल यांनी ३ प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच वंदना मांगटे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून ५ पदके मिळवून दिली. अकोल्याचा संघ उभा करण्यामागे गटविकास अधिकारी राहुल शेळके, सहायक गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जगदीश बनसोडे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर, राजीव गरकल, तालुका समन्वयक अमर गजभिये, रजनीश ठाकरे, नरेश तायडे, श्याम कुलट, नितीन बंडावर यांचे मोलाचे योगदान होते. तद्वतच सर्व सहभागी व विजयी खेळाडूंनी खूप चांगला खेळ करून तालुक्याला विजयश्री प्राप्त करून दिली.

 

टॅग्स :Akolaअकोला