शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडहून गोव्याकडे जाणारा स्पिरीटचा टँकर अकोल्यात पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:48 IST

छत्तीसगड येथून आलेला आणि गोवा येथे जात असलेला ‘रेक्टीफाईड आरएस’ नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेल्या स्पिरिटचा साठा असलेला ट्रक बुधवारी दुपारी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर पकडण्यात आला.

ठळक मुद्देएक हजार लिटर स्पिरिट जप्त उत्पादन शुल्क विभागाची मुर्तीजापूर नजीक कारवाई

- सचिन राऊत

अकोला : छत्तीसगड येथून आलेला आणि गोवा येथे जात असलेला ‘रेक्टीफाईड आरएस’ नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेल्या स्पिरिटचा साठा असलेला टँकर बुधवारी दुपारी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर पकडण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. 

छत्तीसगढ येथील के. ए. ०१ बी ६०८१ क्रमांकाचा रेक्टीफाईड स्पिरिटचा एक टँकर तब्बल एक हजार लिटर स्पिरीट घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुर्तिजापूर ते अकोला या दरम्यान पाळत ठेवली, सदर ट्रक हा मूर्तिजापूर जवळील एक ढाब्यावर असल्याची माहीत मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ट्रक जप्त केला. ट्रक मधील चालक आणि क्लीनर या दोघांची त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही तामिळ असल्याने त्यांना हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषा कळत नव्हती, या अडचणीमुळे उत्पादन शुल्क विभागाने दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले, भाषा न समजल्याने सदर ट्रक कुणाच्या मालकीचा आहे, स्पिरिट कुणाचे आहे हे समोर आले नाही. उत्पादन शुल्क विभागाने तामिळ भाषा समजणारा आणि त्याचे मराठी किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणाºयांचा शोध सुरू केला आहे.  या दोघांची तामिळ भाषेत चौकशी केल्यानंतर सदर प्रकरणाचा भांडाफोड होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी दिली. चालक व क्लीनर तामिळ भाषिकचालक आणि क्लीनर दोघेही हिंदी भाषिक आहेत, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला अधिक माहिती मिळाली नाही, तामिळ भाषेचा ट्रान्सलेट करणारा व्यक्तीचा शोध घेऊन या प्रकरनाचा उलगडा करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत.

यापूर्वीही मुर्तीजापूरात पकडले होते स्पिरिटपोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी २०१४ मध्ये स्पिरिटचा ट्रक पकडला होता, यामध्ये अकोल्यातील बड्या दारू माफियांचा सहभाग असल्याचेही समोर आले होते, मात्र त्यानंतर सर्वच स्तरावर हे प्रकरण 'मॅनेज' करण्यात आले होते, या संदर्भात चांगलीच चर्चा झाली, मात्र ठोस कारवाई झाली नव्हती हे विशेष.

टॅग्स :Crimeगुन्हा