शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलीस दलात ‘स्पीड गन’ कार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:44 IST

फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीड गन मशीन ही वेगाशी स्पर्धा करणाऱ्या वाहनचालकांना अचूक वेधून कारवाई करू शकतील.

ठळक मुद्दे लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गन, ई-चलन, ब्रिथ अ‍ॅनालायझरचा समावेश करण्यात आलेला आहे.मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयाविरुद्ध कारवाईसाठी एक ब्रिथ अ‍ॅनालायझरही या कारमध्ये आहे. ही कार स्वयंचलित असून, नियमाचे उल्लंघन करणाºयांना थेट मोबाइलवर नोटीस पाठविली जाणार आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पोलीस दलातील वाहतूक विभागात दोन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या एका वाहनामध्ये फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीड गन मशीन, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मशीन आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था आहे. यामुळे बेदरकारपणे शिवाय मद्य प्राशन करून वाहन चालविणे चांगलेच महागात पडणार आहे. शहरात अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंध म्हणून आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, म्हणून ही वाहने महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.या एका वाहनांमध्ये असलेली फिक्स टेबल अटॅच वुईथ स्पीड गन मशीन ही वेगाशी स्पर्धा करणाऱ्या वाहनचालकांना अचूक वेधून कारवाई करू शकतील.उल्लेखनीय म्हणजे, ५०० मीटरपर्यंतच्या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे, तसेच या वाहनातील ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मशीन म्हणजे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे.त्याचबरोबर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असलेले संयंत्रही वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणार आहे.पोलीस अधीक्षक अमोघ गावकर तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या प्रयत्नाने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यात मोलाची मदत होणार आहे. संपूर्ण शहरात ही वाहने पेट्रोलिंग करणार असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक पोलिसांवरही वॉचया वाहनात जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाहतूक पोलीस हे वाहन घेऊन गस्तीवर जातील तेव्हा ते कुठे आहेत आणि काय करीत आहेत, याची माहितीदेखील वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे असणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे वाहन अडगळीत उभे करून आराम करण्याचे दिवस आता संपले आहेत. पोलीस कर्मचाºयांनाही सतर्क असावे लागणार आहे. याशिवाय कुठेही वाहतूक कारवाई करावयाची असल्यास या वाहनातील पोलिसांशी संपर्क करून त्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था या सिस्टममध्ये आहे.

‘स्पीड गन कार’ची वैशिष्ट्येस्पीड गन कारमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गन, ई-चलन, ब्रिथ अ‍ॅनालायझरचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाई करणे वाहतूक शाखेला सोपे होणार आहे. या वाहनात रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी वाहने, चारचाकी वाहनात काळी फिल्म लावणाºयांवर स्पीड गन यंत्राच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. एखादे वाहन वेग मर्यादेचे उल्लंघन करून पळाल्यास ३०० मीटरपर्यंत लांब असलेल्या वाहनाचा क्रमांकसुद्धा टिपता येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयाविरुद्ध कारवाईसाठी एक ब्रिथ अ‍ॅनालायझरही या कारमध्ये आहे. ही कार स्वयंचलित असून, नियमाचे उल्लंघन करणाºयांना थेट मोबाइलवर नोटीस पाठविली जाणार आहे. जिल्ह्यात दाखल झालेली स्पीड गन वाहनांपैकी एक जिल्हा वाहतूक शाखेतच राहणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस