शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाची चार जुगार अड्ड्यांवर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST

अकाेला : पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी शहरासह ग्रामीण भागातील जुगार अड्ड्यांवर छापेमारी करीत सुमारे ११ ...

अकाेला : पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी शहरासह ग्रामीण भागातील जुगार अड्ड्यांवर छापेमारी करीत सुमारे ११ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला अंतर्गत येणाऱ्या खैर मोहम्मद प्लॉट याठिकाणी विशेष पथकाने जुगारावर छापा टाकला असता त्या ठिकाणावरुन अशोक जयंती प्रसाद मिश्रा (वय ५१, रा. हरिहर पेठ जुने शहर), राजीव बबनराव घोडके (वय ३८, लाडीस फाईल अकोट फाइल), दत्तात्रय प्रल्‍हाद ठाकरे (वय ५२, डाबकी रोड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने दुसऱ्या कारवाईत शिवनगर पाण्याच्या टाकीजवळ धाड टाकून चंदू रतनलाल अग्रवाल (वय ३७, भीरड लेआऊट), संतोष मनोहर तायडे (वय ३९, हरिहर पेठ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिसरी कारवाई विशेष पथकाने पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील यशवंत नगर वाशिम बायपास येथे करून या जुगारावरून नीलेश सुरेश तेलगोटे (वय ३५, रा. यशवंत नगर), हिरा प्रकाश घुमरे (वाशिम बायपास) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दाेन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदूर येथे छापा टाकून नारायण पुरुषोत्तम भेंडे (वय ४५), नागेश बाबुसिंग सोळुंके (वय ३६), जमीर खान यासीन खान (वय ४५, सर्व रा ग्राम चांदूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ८४ हजारांची राेकड जप्त करण्यात आली आहे. तर खायवाडी करणारा करणारा आरोपी राहुल अरुण कराळे (रा.कौलखेड) याच्याकडून तीन हजारांचा मुद्देमाल जप्त् करण्यात आला आहे. विशेष पथकाने दिवसभरात अवैद्य धंद्यावर धाडसत्र सुरू ठेवत एकूण ११ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली.