शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:58 IST

अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ८३६ नवमतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) अर्ज सादर केले.गत १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली नाही, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०, २१, २७ व २८ जुलै रोजी चार दिवस मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवार, २० जुलै रोजी जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत व मयत मतदारांची नावे वगळणे, नावांत दुरुस्ती व पत्त्यात दुरुस्ती संदर्भात मतदारांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले. मोहिमेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत नावे नोंदणीसाठी ८३६ नवमतदारांनी अर्ज सादर केले. तसेच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी ३३४,नावांत दुरुस्तीसाठी ३६९ आणि पत्त्यात दुरुस्तीसाठी १० मतदारांकडून अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे सादर करण्यात आले.विधानसभा मतदारसंघनिहाय नाव नोंदणीसाठी असे प्राप्त झाले अर्ज!मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात शनिवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ८३८ नव मतदारांकडून अर्ज सादर करण्यात आले. त्यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघात -१३६, बाळापूर विधानसभा मतदारसंघात- ३४०, अकोला पश्चिम विधानसभा मतदासंघात- ५३, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात-७८ व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात २३६ नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग