शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 10:11 IST

१ जुलै ते ४ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत इच्छुक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

अकोला : महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण येत असल्याचे पाहून शहरातील जिल्हा प्रशासन, मनपा तसेच निमा, जीपीए आदी डॉक्टर संघटना पुढे सरसावल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर रुग्ण तपासणीसाठी १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत इच्छुक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा शिरकाव महापालिका क्षेत्रामध्ये झाला असून, शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग शहरातील विविध भागात होत असल्याने संशयित रुग्णांचा शोध घेताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. शहरवासीयांमध्ये कोरोनाबाबत धास्ती व भीतीचे वातावरण असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात नमुने देण्याकडे नागरिक पाठ फिरवित असल्याचे जिल्हा व महापालिकेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांना समोर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांनी केले असता, या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टरांच्या विविध संघटना समोर आल्या आहेत. उद्या बुधवारपासून शहरातील चारही झोनमधील निमा व जीपीए डॉक्टर संघटनेच्या सर्व क्लिनिकमध्ये नागरिकांची तपासणी व उपचार मोफत करणे, संशयित कोरोना रुग्णांना योग्य मार्गदर्शन केल्या जाणार आहे.हरिहरपेठमधील ‘स्वॅब’ केंद्र बंदपश्चिम झोन अंतर्गत येणाºया हरिहरपेठमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येणाºया संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून मनपाने छत्रपती शिवाजी टाऊन शाळेत ‘स्वॅब’ संकलन केंद्र सुरू केले होते. मंगळवारी रुग्ण संख्येत घसरण आल्याचे पाहून या ठिकाणचे केंद्र बंद करण्यात आले आहे. उद्या बुधवारी खदान परिसरात नव्याने ‘स्वॅब’ संकलन केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या