शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ बाधित रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर विशेष लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 10:34 IST

बाधित रुग्ण किंवा संदिग्ध रुग्णाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकांचा बदललेला दृष्टिकोन अन् मिळत असलेल्या वागणुकीमुळे कोरोना बाधित रुग्णांमध्ये नैराश्य पसरू नये म्हणून त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष दिले जात आहे. ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल रुग्णांना पौष्टिक आहारासोबतच दररोज समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती ‘जीएमसी’ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे एकूणच बाधित रुग्ण किंवा संदिग्ध रुग्णाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेला आहे. त्याची प्रचिती जिल्ह्यातही पाहावयास मिळत आहे. सर्वोपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या वॉर्डात रुग्णसेवा देतात म्हणून लोकांचा डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता; पण जे लोक स्वत: कोरोना बाधित असून, या महामारीविरुद्ध लढत आहेत, त्यांना संपूर्ण उपचार होईपर्यंत समाजापासून दूरच राहावे लागत आहे. अशातच गत आठवड्यात सर्वोपचार रुग्णालयात कोरोना बाधित एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या रुग्णांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विशेष लक्ष देत आहे. त्यानुषंगाने या रुग्णांना दररोज कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी समुपदेशन केले जाते. शिवाय, तणावापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

असा दिला जातो पौष्टिक आहारकोरोना बाधित रुग्णांना प्रामुख्याने प्रथिनेयुक्त अन्न दिले जाते. यामध्ये विशेषत: विविध कडधान्यांचा समावेश असतो. रुग्णांना दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचे जेवण आणि आवश्यक औषधोपचार दिला जात असल्याची माहिती ‘जीएमसी’त प्रशासनाने दिली.प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर

कोरोनावर अद्यापही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे उत्तम रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावरच कोरोनाविरुद्धची लढाई लढली जात आहे. म्हणूनच आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध औषधोपचारासोबतच रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे.

रुग्णाचे मानसिक आरोग्य राखण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शिवाय, त्यांना दैनंदिन पौष्टिक आहार दिला जात असून, त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे.- डॉ. अपूर्व पावडे, माजी अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या