शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित सोयाबीनचा बाजारात तुटवडा; महाबीजकडून पुरवठ्याला उशीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:14 IST

कृषी विभागाकडून अनुदान्ाित सोयाबीन बियाण्यांची मागणी झाल्यानंतरही महाबीजकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोमवारी बाजारात तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या.

ठळक मुद्देराज्याच्या कृषी विभागाने शेतकºयांसाठी सोयाबीन बियाणे देण्याची योजना राबवली. अकोला तालुक्यात १३ हजार परमिट देण्यात आले.सोमवारी काही केंद्रात गेलेल्या शेतकºयांना परमिटवर अनुदानित बियाणे देण्यास नकार देण्यात आला.

अकोला : पावसाच्या अंदाजानुसार सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, मूग, उडिदाचे नियोजन केल्यानंतर आता उशीर झाल्याने सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी कृषी विभागाकडून अनुदान्ाित सोयाबीन बियाण्यांची मागणी झाल्यानंतरही महाबीजकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोमवारी बाजारात तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या. शहरातील चार विक्रेत्यांकडेच महाबीजने अनुदानित बियाणे उपलब्ध केल्याची माहिती आहे.राज्याच्या कृषी विभागाने शेतकºयांसाठी सोयाबीन बियाणे देण्याची योजना राबवली. त्यासाठी महाबीजला पुरवठा आदेश देण्यात आला. कृषी विभागाने शेतकºयांना अनुदानित बियाण्यांसाठी परमिट वाटप केले. अकोला तालुक्यात १३ हजार परमिट देण्यात आले. अकोला शहरातील स्वाती, प्रकाश ट्रेडिंग, कोरपे, स्नेहसागर एंटरप्रायजेस, शाह एजंसी या कृषी केंद्रात महाबीजने अनुदानित बियाणे ठेवले. सोमवारी काही केंद्रात गेलेल्या शेतकºयांना परमिटवर अनुदानित बियाणे देण्यास नकार देण्यात आला. महाबीजने परमिटवर वाटपासाठी असलेले अनुदानित बियाणे दिले नाही, त्यामुळ ते देता येत नाही, असा पवित्रा काही कृषी केंद्र संचालकांनी घेतला. त्यामुळे शेतकºयांनी केंद्रातील फलकावर संपर्कासाठी नावे असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला. अधिकाºयांनी संंबंधित शेतकºयांना परमिटवर बियाणे वाटप करण्याचे बजावले. हा प्रकार दिवसभर सुरूच होता. त्याचा त्रास लाभार्थी शेतकºयांसह कृषी विभागाच्या अधिकाºयांनाही झाला. 

महाबीजकडून पुरवठ्याची गती मंदावलीअनुदानित बियाणे पुरवठा करताना महाबीजची गती मंदावली. शहरातील चारऐवजी एक किंवा दोनच केंद्रात बियाणे देणे, दिवसाआड कृषी केंद्र बदलणे, त्याची माहिती लाभार्थी शेतकºयांना नसल्याने त्यांना चारही केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. सोबतच मूर्तिजापूर येथूनही तक्रारी आल्या आहेत. त्यातूनच शेतकºयांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  पावसाच्या विलंबामुळे सोयाबीन क्षेत्र वाढणार!पावसाला विलंब झाल्यामुळे कापूस, मूग, उडीद पिकांचे क्षेत्र घटणार आहे. त्याऐवजी कमी कालावधीचे सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे. त्यामुळेच आधी कापूस पीक पेरण्याच्या तयारीत असलेले शेतकरी आता सोयाबीनसाठी बाजारात धाव घेत आहेत. तो अंदाज घेत महाबीजकडे कृषी विभागाने मागणी केलेल्या ३० हजार क्विंटलमध्ये पाच हजारांची भर टाकत पुरवठा केल्याची माहिती आहे. कृषी विभागाच्या मागणीनुसार अनुदानित सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करताना महाबीजकडून उशीर होत आहे. त्यामध्ये सुधारणेची गरज आहे. त्यातच इतर तालुक्याच्या सीमावर्ती गावातील परमिटधारक शेतकरीही अकोल्यातच येत असल्याने ताण वाढला आहे.- अजय शास्त्री, तालुका कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजagricultureशेती