शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे १२ रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:27 IST

भविष्यात सोयाबीन तेलाचे भाव यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

- संजय खांडेकर

अकोला : गत आठवडाभरात सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे १२ रुपयांनी घसरले आहेत. यामुळे अनेक व्यापारी-उद्योजकांना आर्थिक फटका बसला असला तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चीनने अंतर्गत परिस्थितीमुळे सोयाबीनच्या तेलाची खरेदी नाकाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेल साठा भारतात मोठ्या प्रमाणात वळल्याने तेलाचे भाव पडले आहे. मागील आठवड्यात ९७ रुपये किलो विक्री होत असलेले सोयाबीन तेल आता ८५ रुपये किलोच्या दरावर स्थिरावले आहे. भविष्यात सोयाबीन तेलाचे भाव यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.भारत आणि चीन या दोन देशात सोयाबीन तेलाची मोठी मागणी सातत्याने असते. भारतातील ७० टक्के तेल विदेशातून आयात होते. केवळ ३० टक्केच तेलाची निर्मिती देशाअंतर्गत होते. सोयाबीन आणि पाम तेल इतर तेलांच्या तुलनेत स्वस्त असल्याने गोरगरीब जनतेतून त्याला जास्त मागणी असते. दरम्यान, यंदा तेलबिया वाण असलेल्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने दिवाळीपासून सोयाबीन तेलाचे भाव सातत्याने वधारत गेले. दिवाळीपूर्वी ७८ रुपये किलो विकल्या जाणाऱ्या तेलाचे भाव काही महिन्यातच १०४ रुपये किलोपर्यंत पोहोचले. ते मागील आठवड्यात ९७ रुपयांवर आले. दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला. त्यामुळे चीनने यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून येणाºया सोयाबीन तेलाची खरेदी नाकारली. भारत आणि चीन या दोघांकडूनच तेलास मागणी असते. त्यात चीनने सोयाबीन तेलाची खरेदी नाकारल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाची मोठी आयात भारताकडे आपसूकच आली आहे. त्यामुळे तेलाचे भाव कोसळले आहे.या देशातून होतो पुरवठा*भारताला ७० टक्के तेल आयात करणाºया देशामध्ये अमेरिका, अर्जेंटिना, युक्रेन, इंडोनेशिया, मलेशिया यांचा समावेश आहे. या देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे तेल दरवर्षी येते. चीनने खरेदीस नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता सोयाबीन तेल खरेदीदार म्हणून भारत एकमेव देश उरला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल भारतात आयात होत असल्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव पडले. भविष्यात याहीपेक्षा खाली भाव कोसळण्याचे संकेत मिळत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय