शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यात सोयाबीन, कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:23 IST

शिर्ला : पातूर तालुक्यात ३१ हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकावर सध्या हिरवी उंट अळी आणि चक्रीभुंगा, तर कपाशीवर गुलाबी रंगाच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही बाब कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी २१ ऑगस्ट रोजी केलेल्या पीक पाहणी दौर्‍यात निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्दे३१ हजार हेक्टरवरील पिकाला ग्रासले कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांनी केला तालुक्याचा दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यात ३१ हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकावर सध्या हिरवी उंट अळी आणि चक्रीभुंगा, तर कपाशीवर गुलाबी रंगाच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही बाब कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी २१ ऑगस्ट रोजी केलेल्या पीक पाहणी दौर्‍यात निदर्शनास आली आहे.पातूर तालुक्यात ३१ हजार हेक्टरवर कमी-अधिक प्रमाणात सोयाबीन, कपाशी लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. यंदा अल्प प्रमाणात पडणार्‍या पावसामुळे बहुतांश शेतकर्‍यांवर तिबार पेरणीचे संकट आले आहे. पातूर तालुक्यात पीक परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्या डॉ. पंदेकृविचे एम. एस. ठाकरे, त्यांची चमू तसेच पातूर, बाश्रीटाकळी, बाळापूर तालुका कृषी अधिकार्‍यांनी सोमवारी पातूर तालुक्यातील विविध प्रक्षेत्रावर जाऊन पीक पाहणी केली. त्यांना सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणारी हिरवी उंट अळी व चक्रीभुंगा तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला असल्याचे आढळून आले आहे.पावसाचे अपुरे आणि सौम्य प्रमाण यास कारणीभूत असल्याचे मत चमूने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. तिबार पेरणीमुळे आर्थिक ओझ्याने दबलेल्या शेतकर्‍यांसमोर विविध प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचे आव्हान उभे ठाकले असल्याने ते पिकाच्या नुकसानास कारणीभूत ठरत आहे.