शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही जाणवणार सोयाबीनचा तुटवडा !

By admin | Updated: March 15, 2016 02:11 IST

राज्यात पंधरा लाख क्विंटलवर बियाण्याची गरज ; महाबीजने चालवली तयारी.

अकोला : सतत तीन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, उत्पादन आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने यावर्षीही बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेकडो शेतकरी दरवर्षी घरचे बियाणे वापरतात; पंरतु यावर्षी शेतकर्‍यांकडे सोयाबीनच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) सोयाबीनचे बियाणे कमी पडू नये, यासाठी तयारी सुरू केली आहे. गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला आहे. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने, यावर्षी सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. तरीही उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, यावर्षी तर बियाण्यांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेकडो शेतकरी उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत असताना, खासगी बाजारात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल २५00 ते २९00 च्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन वाळले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगांची वाढ खुंटली होती. हाच धागा धरू न शेतकर्‍यांच्या सोयाबीनची बाजारात लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीन उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. सतत दोन वर्षांच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकरी शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारात विकायला आणत आहेत. हमीभावाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे प्रतिक्विंटल हमीदर २५६0 वर स्थिरावले आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.