शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात सोयाबीनची आवक वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:45 IST

मंगळवारी सोयाबीनची आवक ही ५ हजार ९५१ क्विंटल एवढी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सोयाबीनची आवक सरासरी ६ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत प्रतिक्विंटल कमीत कमी ३,१०० ते सरासरी ३,६०० रुपये दर दिले जात आहेत.परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, सोयाबीनचेही नुकसान झाले असून, प्रत खराब झाली आहे. अकोल्याच्या बाजार समितीमध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ३,८०० रुपये दर दिले जात आहे. मंगळवारी सोयाबीनची आवक ही ५ हजार ९५१ क्विंटल एवढी होती.मुगाचे हमीदर यावर्षी प्रतिक्विंटल ७५ तर उडिदाचे दर १०० रुपयांनी वाढविण्यात आले. मागील वर्षी मुगाला प्रतिक्विंटल ६,९७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आले होते. यावर्षी हे दर ७ हजार ५० रुपये करण्यात आले आहेत. उडिदाचे हमीदर मागील वर्षी ५,६०० रुपये होेते, ते यावर्षी ५,७०० रुपये आहेत. मुगाच्या दरात ७५ तर उडिदाच्या हमीदरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली. असे असले तरी आजमितीस मुगाला बाजारात प्रतिक्विंटल ४,६०० ते सरासरी ५,८०० रुपयेच दर आहेत. या हमीपेक्षा हे दर कमी आहेत. उडिदाचे दरही प्रतिक्विंटल ४ हजार ते सरासरी ५ हजार २०० रुपये आहेत. हे दरही बाजारात कमी आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात मूग विकणे पसंत केले आहे. आता मूग, उडिदाची आवक घटली असून, अकोला बाजार समितीमध्ये मंगळवारी मूग ४३ व उडीद ९१ क्विंटल आवक झाली. सरासरी ही आवक असून, यावर्षी मूग, उडीद पिकाचेही खूप नुकसान झाल्याने आवक घटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हरभºयाची आवकही जवळपास २३१ क्विंटल असून, प्रतिक्विंटल कमीत कमी ३,७००, सरासरी ३,३५० रुपये आहेत. तुरीची आवक १२ क्विंटल होती. तुरीचे प्रतिक्विंटल कमीत कमी ४,८०० ते सरासरी ५,३०० रुपये आहेत. लोकल ज्वारीची आवक दररोज सरासरी ३३० क्विंटल असून, मंगळवारी ३३३ क्विंटल आवक होती. अकोला बाजार समितीमध्ये या ज्वारीला कमीत कमी प्रतिक्विंटल १,३०० रुपये तर सरासरी १,६५० रुपये दर आहेत. शरबती गव्हाचे सरासरी प्रतिक्विंटल दर २,७५० रुपये आहेत. आवक २५ क्विंटल आहे. लोकल गव्हाची आवक ३५ क्विंटल असून, प्रतिक्विंटल सरासरी दर २,१०० रुपये आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती