शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 18:38 IST

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू असून, दर प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये आहेत. हे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत.

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू असून, दर प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये आहेत. हे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत.यावर्षी सुरुवातीला सोयाबीनची आवक बाजारात चार हजार क्ंिवटलपर्यंत पोहोचली होती. सुरुवातीला सोयाबीनचे दर कमी होते. तथापि, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी सोयाबीनची विक्री केली. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन दर ३,७०० रुपयांवर पोहोचले होते. आता हे दर कमी झाले असून, प्रतिक्ंिवटल सरासरी ३,५२५ रुपये आहेत. चांगल्या दर्जेदार पिवळ्या दाण्याच्या सोयाबीनला प्रतिक्ंिवटल ३,५५० रुपये दर आहेत. मागील महिन्यापासून हे दर स्थिर आहेत. शेतकऱ्यांना मात्र आणखी दर वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी १,३०० क्ंिवटल आवक सुरू आहे. शुक्रवारी १,३४९ क्ंिवटल आवक होती. हरभºयाचे दर मात्र कमी आहेत. हरभºयाची सरासरी आवक दररोज ११०० क्ंिवटल आहे. शुक्रवारी ही आवक १,१२३ क्ंिवटल होती. हरभºयाचे दर आजमितीस सरासरी प्रतिक्ंिवटल ४,३५० रुपये आहेत तर जास्तीत जास्त प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये दर आहेत. हरभºयाचे हे दर हमीदरापेक्षा कमी आहेत. पांढºया हरभºयाची आवक केवळ २२ क्ंिवटल असून, प्रतिक्ंिवटल सरासरी ४,५०० रुपये दर आहेत. जास्तीत जास्त आणि कमीत कमी दरही ४,५०० रुपये आहेत. तिळाचे दर मात्र प्रतिक्ंिवटल सरासरी, जास्त १०,४०० आहेत. हे दर सर्व धान्यापेक्षा जास्त आहेत. तिळाची आवक मात्र दोन क्विंटल एवढीच आहे. तुरीचे दरही गत महिन्यापासून स्थिर असून, प्रतिक्ंिवटल सरासरी ५,८०० रुपये आहेत. जास्तीत जास्त ५,९०० तर कमीत कमी दर प्रतिक्ंिवटल ५,४०० रुपये आहेत. तुरीची आवक सरासरी ६०० क्ंिवटल असून, शुक्रवारी ही आवक ६३५ क्ंिवटल होती. मुगाची आवक घटली आहे. सध्या सरासरी १८० क्ंिवटल आवक असून, शुक्रवारी १८४ क्ंिवटल आवक होती. शुक्रवारी मुगाचे दर प्रतिक्ंिवटल सरासरी ५,४५० रुपये होते. जास्तीत जास्त दर ६,२०० रुपये प्रतिक्ंिवटल तर कमीत कमी दर ४,२०० रुपये आहेत. उडीद कडधान्याची आवक घटली आहे. शुक्रवारी उडिदाची आवक केवळ ३० क्ंिवटल होती. प्रतिक्ंिवटल सरासरी दर ४,६५० रुपये आहेत. जास्तीत जास्त ४,९०० तर कमीत कमी दर ४,१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत.

 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाagricultureशेती