शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

...आता करावी लागणार अर्ध रब्बी पिकांंची पेरणी!

By admin | Updated: July 11, 2017 02:15 IST

कृषी विद्यापीठाचे नियोजन तयार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीची वेळ संपली आहे. दीड महिन्यांपासून सार्वत्रिक पाऊस नसल्याने आता अर्ध रब्बी पिकांची पेरणी करावी लागणार आहे. विदर्भासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे नवे पीक नियोजन तयार केले आहे. आणखी हीच परिस्थिती आठ दिवस राहिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना तूर व सूर्यफूल पिकांचा अर्ध रब्बी पेरणीसाठी पर्याय निवडावा लागणार आहे. विदर्भातील कोरडवाहू पिकाखाली ९० टक्के क्षेत्र असून, पिकांची उत्पादन क्षमता ही वेळेवर व नियमित पावसावरच अवलंबूून आहे. अलीकडच्या तीन-चार वर्षांच्या काळात पावसाच्या अनियमिततेच्या समस्या वारंवार उद्भवत असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी एक महिन्यापासून विदर्भात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंकुरलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांना नव्याने पीक पेरणीत बदल करावे लागणार आहेत. त्या अनुुषंगाने या कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. पावसाचे भाकीत, वेगवेगळे अंदाज पुन्हा वर्तविण्यात येत असले, तरी या अंदाजावर कितपत निर्भर राहायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने आता आपत्कालीन सोबतच अर्ध रब्बी पिकांचे नियोजन केले आहे.नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त १६ ते २२ जुलैपर्यंत उशिरा सुरू होत असेल, तर पेरणी करताना २० ते २५ टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा लागेल. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करू न सुधारित वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा लागणार आहे.मूग, उडीद या पिकांची पेरणी अजिबात करू नये, २३ ते २९ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी शक्यतो करू नये, केल्यास २५ ते ३० टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे, सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. ज्वारी पिकाबाबत याच पद्धतीने नियोजन करावे लागेल. पूर्व विदर्भात ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यास, धान पिकाची पेरणी सलग दोन दिवस करावी, धान पिकाच्या लवकर येणाऱ्या व मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी १५ जुलैपर्यंत रोपवाटिकेत करावी. पावसाळ््याच्या सुरुवातीचे दोन महिने हे अंत्यत महत्वाचे असून, या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबूून असते. यावर्षी थोडा पावसाळा लांबल्याने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. या परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखात बदल, पावसाच्या पडणाऱ्या कालावधीनुसार पिकांची निवड, मशागत करावी लागते. या दोन-तीन दिवसांत पावसाची अपेक्षा आहे. पाऊस आणखी लांबल्यास अर्ध रब्बी पिकांचा पर्याय निवडावा लागेल.- डॉ. दिलीप एम. मानकर, संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.