शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसातच केली शेतकऱ्यांनी पेरणी!

By admin | Updated: June 30, 2017 01:38 IST

तापमानात वाढ; बियाणे कुजण्याचे प्रकार वाढले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी दमदार पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांनी अल्प पावसानंतर पेरणी केली आहे; परंतु पावसाने दडी मारली असून, तापमानातही वाढ झाल्याने पेरलेले बियाणे कुजण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली; पण पुन्हा पाऊस गायब झाला आहे.मान्सूनच्या पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खरीप पिकांचीही पेरणी केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरीप पिकांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात जून महिना संपत आला, तरी पेरणीलायक पाऊस नाही, त्यामुळे ६० टक्क्यांवर पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मान्सूनपूर्व कपाशीची छोटी झाडे तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी कापसाचे हे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील बोंदरखेड, पांढरी, सांगळूद, यावलखेड, चाचोंडी, अलियाबाद, बाभूळगाव, डोंगरगाव, सिसा, मासा, गुडधी आदी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी परवा पडलेल्या पावसामुळे पेरणीची तयारी केली, तर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे. पांढरी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. जमिनीत ओलावाच नसून, अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन वरच पडले आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात मूग पिकाची पेरणी केली होती. त्या मुगाची वाढ खुंटली असून, आता मूग, उडीद पेरणीचे दिवस संपले आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल, तर कापूसही त्यानंतर काही दिवस पेरता येईल, त्यासाठी पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. काही तालुक्यांत काही गावांच्या शिवारात पाऊस पडल्याने तेथील पिकांना संजीवनी मिळाली; परंतु तेथील पिकांना पावसाचा ताण सहन करावा लागल्याने उत्पादन किती येणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.