शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अकोला जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:08 IST

अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देगत १९ व २० जून रोजी जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर काही भागात खरीप पेरण्यांना सुरुवात करण्यात आली. २५ जूनपर्यंत १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर (३० टक्के)पेरण्या आटोपल्या. जिल्ह्यातील सातही तालुक्यात रखडलेल्या पेरण्या मार्गी लागण्यासाठी सार्वत्रिक आणि दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.गत १ जूनपासून पावसाळा सुरू झाला २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; परंतु जिल्ह्यातील सातही तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस अद्याप बरसला नाही. पेरणीलायक पाऊस झाला नसल्याने, खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या. गत १९ व २० जून रोजी जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर काही भागात खरीप पेरण्यांना सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ४ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून, त्या तुलनेत २५ जूनपर्यंत १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर (३० टक्के)पेरण्या आटोपल्या. त्यामध्ये पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व अकोला तालुक्यात पूर्व भागातील पेरण्यांचा समावेश असून, अकोट व तेल्हारा तालुक्यात पेरण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित ७० टक्के पेरण्या मार्गी लागणे अद्याप बाकी असून, पेरणीलायक पाऊस झालेल्या जिल्ह्यातील काही भागात खरीप पेरण्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी, जिल्ह्यातील सातही तालुक्यात रखडलेल्या पेरण्या मार्गी लागण्यासाठी सार्वत्रिक आणि दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.अकोल्यात धुवाधार पाऊस;१४ मी.मी.पावसाची नोंद !सोमवारी सायंकाळी अकोला शहर आणि परिसरात धुवाधार पाऊस बरसला. सायंकाळी ६.२० ते ७ वाजेपर्यंत अकोला परिसरात १४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अकोल्यात रिमझिम पाऊस सुरूच होता. शहरासह जिल्ह्यातील काही भागातही रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmonsoon 2018मान्सून 2018agricultureशेती