शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वोरा अंध विद्यालयात दिव्यांगांसाठी साकारले सेन्सरी गार्डन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:49 IST

अकोला : अंध विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञान आवाजाने बागेतील खेळणी हाताळता यावी आणि त्याचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी श्री शिवाजी इंजिनिअरिंगच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंनी मलकापूरच्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयात सेन्सरी गार्डनची निर्मिती केली आहे. हैदराबादच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या सेन्सरी गार्डनचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. त्यामुळे अत्याधुनिक असलेल्या या अंध विद्यालयातील शेकडो विद्यार्थी सेन्सरी गार्डनचा उपभोग घेणार आहेत.

ठळक मुद्देसर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी नासातर्फे बक्षीस शिवाजी इंजिनिअरिंगच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंचा उपक्रम

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अंध विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञान आवाजाने बागेतील खेळणी हाताळता यावी आणि त्याचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी श्री शिवाजी इंजिनिअरिंगच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंनी मलकापूरच्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयात सेन्सरी गार्डनची निर्मिती केली आहे. हैदराबादच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या सेन्सरी गार्डनचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. त्यामुळे अत्याधुनिक असलेल्या या अंध विद्यालयातील शेकडो विद्यार्थी सेन्सरी गार्डनचा उपभोग घेणार आहेत.देशभरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंना दरवर्षी सामाजिक परिणामाचा सामूहिक प्रकल्प तयार करायचा असतो. वेगळ्या पद्धतीचा प्रकल्प तयार करण्यासाठी अकोला बाभूळगाव येथील श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे द्वितीय व तृतीय वर्षांंच्या विद्यार्थ्यांंनी अनेक ठिकाणी भेटी दिल्यात. दरम्यान, या विद्यार्थ्यांंची चमू मलकापूरच्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयात पोहोचली. स्पर्शज्ञानाने जीवन व्यतित करणार्‍या विद्यार्थ्यांंसाठी गार्डन तयार करण्याची संकल्पना सुचली. विद्यार्थी चमूचे प्रमुख स्नेहवर्धन गायकवाड आणि गौरव साधवाणी यांनी सेन्सरी गार्डन निर्मितीला सुरुवात केली. अंध असलेले विद्यार्थी केवळ स्पर्शानेच नव्हे, तर वस्तू आणि व्यक्तीच्या आवाजाच्या दिशेनेही वेध घेतात, ही बाब त्यांना प्रात्यक्षिकातून कळली. त्यानंतर तब्बल तीन दिवस ६0 विद्यार्थ्यांंची चमू या अंध विद्यार्थ्यांंच्या स्वभावावर अभ्यास करीत राहिली. त्यानंतर हैदराबाद येथील सेन्सरी गार्डनची माहिती घेत प्रयोग सुरू केलेत. जमिनीचे स्ट्रक्चर तपासून परिसराची स्वच्छता केली गेली. आराखडा तयार केला गेला. त्यानंतर लॉन, लायटिंग, स्टॅच्यू, विंगचेन, भौगोलिक नकाशे, इम्बोसिंग, अंधाच्या लिपीतून सूचना तयार करण्यात आल्यात. ही सर्व निर्मिती टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आली. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, विभाग प्रमुख दिलीप जडे आणि अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम. भोंगाडे, दिलीप म्हैसने, शेख भोंबडे, संदीप गुळाखे, अमोल नसुरडे, सुरेशभाई शाह यांचे मार्गदर्शन मोलाचे सिद्ध झाले. गत तीन महिन्यांपासून सतत परिश्रम घेत आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांंनी सेन्सरी गार्डन तयार केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनी करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रकल्पाचा सहभागसवरेत्कृष्ट ठरणार्‍या समूह प्रकल्पास आंतरराष्ट्रीय नासातर्फे दरवर्षी एएनडीसी ट्रॉफी दिली जाते. गेल्या ६0 वर्षांंपासून या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशातील ऑर्किटेक्चरचे विद्यार्थी सहभागी होत असतात.