अकोला- वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांची अकोला महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची नागपूर येथे बदली झाल्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश आली. कल्याणकर यांची नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर २0 जानेवारी रोजी बदली झाली होती. त्यापूर्वी दिवाळीपासूनच ते प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे देण्यात आला होता. कल्याणकर यांच्या बदलीमुळे रिक्त असलेल्या पदावर वर्धा येथील ह्यअह्ण वर्ग नगर परिषदचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तीन महिन्यांनंतर अकोला मनपाला नियमित आयुक्त मिळाले आहेत. शेटे यांची तीन महिन्यापूर्वीच वर्धा नगरपरिषदेत सीओ म्हणून नियुक्त झाले होते. आता त्यांच्याकडे अकोला मनपाचे आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली. नवीन आयुक्त येत्या सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
सोमनाथ शेटे नवे मनपा आयुक्त
By admin | Updated: February 5, 2015 01:41 IST