शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खारपाणपट्ट्यातील गावांच्या समस्या सोडवा! - ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 2:15 PM

अकोला: खारपाणपट्ट्यातील जनतेला प्रामुख्याने भेडसावणाºया समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सात गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिलेल्या भेटीदरम्यान केली.

अकोला: खारपाणपट्ट्यातील जनतेला प्रामुख्याने भेडसावणाºया समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सात गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिलेल्या भेटीदरम्यान केली. त्या समस्या निकाली काढण्यासाठी संबंधितांना तेथेच निर्देश देण्यात आले. काही समस्या प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर निकाली काढण्यात येतील, असा विश्वासही ग्रामस्थांसमोर व्यक्त करण्यात आला.अकोला तालुक्यातील म्हातोडी, आपोती बु., आखतवाडा, आपातापा, कौलखेड गोमाशे, कपिलेश्वर, वडद बु., या गावांच्या दुष्काळग्रस्त व पाणीटंचाई निवारण करण्यासाठी थेट ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार रणधीर सावरकर, माजी मंत्री दशरथ भांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रकाश रेड्डी, गणेश अंधारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राहुल शेळके, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, भूसंवियचे मेंढे, विस्तार अधिकारी मदन सिंग बहुरे, दीपक इंगळे यांच्यासह कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाई निकाली काढण्यासाठी कायमस्वरूपी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत उपाययोजना कराव्या, तसेच ६४ खेडी योजनेतून पुरवठ्याची मागणी केली. म्हातोडी येथे वान प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करावा, आपोती बुद्रूक येथे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर जादा सुरू करणे, गावातील प्रत्येक वॉर्ड, गल्लीत टँकर पाठवावा, प्रत्येक कुटुंबाला सारखे पाणी मिळावे, त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी नियोजन करावे, गावांमध्ये मनरेगामधून एक सार्वजनिक काम सुरू करणे, त्यांचे मस्टर काढणे, घरकुल बांधकाम प्रत्येक गावात सुरू करणे, घरकुलासाठी जागेची समस्या आहे, त्यांचे प्रस्ताव सादर करणे, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मनरेगामधून करणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, जिल्ह्यात प्रत्येक प्रकारचे बियाणे व खत भरपूर प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काळाबाजार होणार नाही, पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले. आपातापा गावातील पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे.- नाला खोलीकरण, रुंदीकरण करणे, शेततळे खोदणे, शेतरस्त्याची कामे करणे, विहीर पुनर्भरणाचे काम सुरू करणे, गावातील रस्ते करणे, गुरांना चारा उपलब्ध करून देणे या मागण्याही ग्रामस्थांनी केल्या. त्यावर दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सांगितले.- गुरांना पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो, कायमस्वरूपी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. सोबतच म्हातोडी गावाला जलशुद्धीकरण यंत्रणा आमदार निधीतून उपलब्ध केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकर