शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आता ‘जीएसटी’चे राज्यभरात मदत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:36 IST

अकोला : करदात्यांच्या समस्या लक्षात घेत (वस्तू आणि सेवाकर) ‘जीएसटी’ कार्यालयाने राज्यभरात मदत कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

- संजय खांडेकर

अकोला : करदात्यांच्या समस्या लक्षात घेत (वस्तू आणि सेवाकर) ‘जीएसटी’ कार्यालयाने राज्यभरात मदत कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जीएसटी अधिकारी आता नवीन अर्जकर्ते, बदलकर्ते आणि अर्ज रद्द करणाºयांच्या समस्या सोडविणार आहेत. राज्यभरात मदत कक्ष उघडण्याचे निर्देश जीएसटीचे राज्य कर आयुक्त राजीव जलोटा यांनी दिले असून, विविध विभागातील त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.जीएसटीच्या आॅनलाइन यंत्रणेत अजूनही अनेक तांत्रिक चुका असून, त्या सोडविल्या नाहीत. या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जीएसटीचे राज्य कर आयुक्त राजीव जलोटा यांनी २४ आॅक्टोबर रोजी एक परिपत्रक काढून प्रत्येक विभागाने आणि संबंधित जीएसटी कार्यालयाने मदत कक्ष उघडून करदात्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, पुणे, रायगड, सोलापूर, धुळे या जीएसटी कार्यालयांच्या विभागात आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी दुसºयाच दिवसापासून सुरू झाली आहे.स्थलांतराचे विषय अजूनही मोठ्या प्रमाणात रेंगाळत पडल्याने काही व्यापारी-उद्योजकांना विनाकारण कर भरावा लागत आहे. अनेकांनी जीएसटीची नोंद केली; मात्र आता व्यापार नसल्याने विनाकारण कर भरण्याची वेळ आली. काहींना स्लबमध्ये बदल करायचा आहे, तर काहींना जीएसटी क्रमांक रद्द करावयाचा आहे. जीएसटी रिटर्न थ्री बी, जीएसटीआर वन, फोर, फाइव्ह, सिक्स, सेव्हनच्या अडचणी आणि रिफंडबाबत येणाºया प्रत्येक अडचणीवर मदत कक्षातून मार्गदर्शन मिळणार आहे. केवळ करदात्याला प्रत्यक्ष या मदत कक्षात यावे लागेल किंवा संबंधितांचा पासवर्ड आणि संमती आवश्यक आहे. 

अकोल्यात कार्यरत मदत कक्षाचा करदात्यांनी आणि कर सल्लागारांनी लाभ घेऊन सुधारणा करून घ्यावी. मार्गदर्शन आणि बदलच्या दोन्ही सेवा देण्यासाठी मदत कक्ष उपयुक्त ठरेल.-अनिल करडेकर,राज्य कर उपायुक्त, जीएसटी कार्यालय अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी