शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन कागदावर; समितीचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:16 IST

अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ‘आॅगस्ट क्रांती मोहिमे’नंतर आता शासनाने राज्यस्तरीय नियंत्रण समितीचे गठन केले असून यामध्ये शहर विकास विभागाचे सचिव, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह पर्यावरण विभागाच्या सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पासाठी ५०० टन कचºयाची अट पाहता ‘ड’वर्ग महापालिकांसमोर कचरा जमा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी महापालिकांना १ मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एप्रिल २०१८ पर्यंत शहरात निर्माण होणाºया कचºयापैकी किमान ८० टक्के कचºयाचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करण्याचे शासनाचे निर्देश होते. विलगीकरण केलेल्या कचºयापासून विकेंद्रित अथवा केंद्रित पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रक्रिया प्रकल्प न सुरू केल्यास अनुदान बंद करण्याचा इशारा शासनाने दिला होता. त्यानंतर जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यादरम्यान १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट दरम्यान ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’मोहिम राबवण्याचे निर्देश होते. एकूणच घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर शासनाकडून वारंवार दिशा निर्देश दिले जात असले तरी दुसरीकडे केंद्राच्या ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पांतर्गत कचºयावर प्रक्रियेसाठी ५०० टन कचºयाची अट नमुद केली आहे. ‘ड’वर्ग महापालिकांमध्ये दैनंदिन २०० ते २५० टन कचरा निघत असल्याने केंद्राची ५०० टन कचºयाची अट शिथील करण्याची मागणी महापालिकांच्या स्तरावर होत आहे. ही अट शिथील न झाल्यास अनेक महापालिकांना केंद्र शासनाच्या ‘सॉलीड वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पासून वंचित राहावे लागण्याची चिन्हं आहेत.महिन्यातून दोनवेळा आढावाशासनाने गठीत केलेल्या समितीकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर महापालिका, नगर पालिकांचा महिन्यातून दोन वेळा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये स्वायत्त संस्थांना भेडसावणाºया समस्यांचे निराकरण केले जाईल.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न