शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महाबीजच्यासोयाबीन बियाण्यात मातीचे खडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:08 IST

महाबीजने बियाण्याचा दर्जा योग्य राखला नसल्याने त्या शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन खरीप हंगाम पेरणीच्या धामधुमीत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यात मातीचे खडे निघत असून, बॅगचे वजनही ४०० ग्रॅमपर्यंत कमी भरत असल्याचा प्रकार अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथील शेतकरी ज्ञानेश्वर कडू, सुनीता गावंडे यांच्याकडे उघड झाला आहे. याप्रकरणी महाबीजने बियाण्याचा दर्जा योग्य राखला नसल्याने त्या शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.कौलखेड जहागीर येथील शेतकरी ज्ञानेश्वर कडू, सुनीता गावंडे यांनी पाऊस पडल्यानंतर बियाण्याला औषध लावण्याचे काम सुरू केले. महाबीज कंपनीच्या बॅगमधून काढलेल्या सोयाबीनमध्ये मोठ्या आकाराचे मातीचे खडे, काळ्या रंगाचे काही दाणे दिसून आले. त्यामुळे बियाणे पॅक करण्यापूर्वी त्याची स्वच्छता व प्रतवारी केली नाही का, असा प्रश्न या दोन्ही शेतकºयांना पडला. बियाण्याला झेलोरा औषध लावण्यासाठी आलेले मजूर संदीप झोंबाळे, मंगेश तायडे यांच्याकडून मातीचे खडे वेचून घेतले. त्यावेळी एका बॅगमध्ये १५० ते २०० ग्रॅम वजनाचे खडे निघाले. तसेच बॅगची मोजणी केली असता ३०० ते ४०० ग्रॅम वजन कमी भरले. त्यात बारदान्याचे वजन ४०० ग्रॅम, थायरम पावडर- १५० ग्रॅम तसेच २०० ग्रॅम मातीचे खडे मिळून एकूण १ किलो १५० ग्रॅम बियाण्याचे शेतकºयांचे नुकसान आहे.एका बॅगमध्ये एवढे वजन कमी होत असल्याने शेतकºयांनी बियाण्यांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यातच बियाण्याची स्वच्छता, प्रतवारी झाली नसेल तर ते बियाणे उगवते की नाही, ही धास्तीही शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. या बाबीची दखल घेऊन महाबीजने सुधारणा करावी, अशी मागणीही त्या शेतकºयांनी केली आहे.

यापूर्वी महाबीजच्या सोयाबीन बियाणे एका गोणीत ३०० ते ४०० ग्रॅम कमी निघाले. आता त्यामध्ये माती खडे निघत आहेत. एका बॅगमध्ये जवळपास १०० ग्रॅम हे खडे आहेत. याकडे महाबीजने लक्ष देण्याची गरज आहे.- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला.

बियाणे बीजोत्पादक शेतकरी स्वत: गे्रडिंग करून आणतात. आम्ही पुन्हा तीन वेळा शेतकºयांनी आणलेल्या बियाण्यांचे गे्रडिंग करतो. हे सर्व गे्रडिंग यंत्राने केल्या जाते. त्यामुळे बियाण्यात खडे निघतच नाही. शंका असल्यास शेतकºयांनी ही गे्रडिंग पद्धत बघावी- अजय कुचे,महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीज