शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट ’; आता नमुने तपासणीच्या अहवालाकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:06 IST

अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत शुक्रवारपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले.

ठळक मुद्देशासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने २२ ते २७ जुलै या कालवधीत घेण्यात आले.

अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत शुक्रवारपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले. घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने रस्ते कामांच्या नमुने तपासणीसह तपासणीचा अहवाल केव्हा प्राप्त होणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने २२ ते २७ जुलै या कालवधीत घेण्यात आले. सहा दिवसांत शहरातील रस्ते कामांचे तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७६ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत संबंधित तज्ज्ञांच्या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सीलबंद करण्यात आलेले रस्ते कामांचे नमुने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने तपासणीसाठी रस्ते कामांचे नमुने प्रयोगशाळेकडे केव्हा पाठविण्यात येणार आणि तपासणीचा अहवाल केव्हा प्राप्त होणार, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.१ आॅगस्ट रोजी नमुने तपासणीसाठी पाठविणार?रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये घेण्यात आलेले सहा रस्ते कामांचे ७६ नमुने सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवार, १ आॅगस्ट रोजी नमुने तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.नमुने घेण्यात आलेले असे आहेत रस्ते!शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये सहा रस्ते कामांचे ७६ नमुने तीन पथकांमार्फत घेण्यात आले. त्यामध्ये मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, माळीपुरा ते मोहता मिल चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगीचा आणि गोरक्षण रोड (नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालयापर्यंत) इत्यादी रस्ते कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका