शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील ‘नरेगा’चे ‘सोशल ऑडिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 10:34 IST

कोरोना काळात करण्यात येत असलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्यात येणार.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत कोरोना काळात करण्यात येत असलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत राज्य शासनाच्या सामाजिक अंकेक्षण विभागाच्या संचालकांना १५ जुलै रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ‘नरेगा’ अंतर्गत राज्यात करण्यात येत असलेल्या कामांचे ‘सोशल ऑडिट’ लवकरच सुरू होणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशभरात कामांची मागणी होत आहे. त्यानुसार सद्यस्थितीत सर्वत्र रोजगार हमी योजनेची कामे असून, मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत १५ जुलै रोजी सर्व राज्यांच्या सामाजिक अंकेक्षण विभागाच्या संचालकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘नरेगा’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या राज्यातील कामांचे ‘सोशल ऑडिट’ करण्यात येणार आहे.अशा आहेत मार्गदर्शक सूचना!कोरोना काळात ‘नरेगा’ अंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचे प्रत्येक महिन्यात ‘सोशल आॅडिट’ करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या सामाजिक अंकेक्षण विभागाच्या नियंत्रणात ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. सोशल आॅडिटकरिता ग्रामपातळीवर भारत निर्माण सेवक, ग्राम साधन व्यक्ती, बचतगट प्रतिनिधी, युवक प्रतिनिधी, उपलब्ध संघटनेचा एक प्रतिनिधी इत्यादींची ग्रामसाधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात येणार आहे. तसेच सोशल आॅडिटची प्रक्रिया योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण संचालनालयाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा साधनव्यक्ती संबंधित जिल्ह्याातील ‘सोशल आॅडिट’ प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणार आहेत.‘सोशल ऑडिट’चे जिल्हानिहाय वेळेपत्रक!केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नरेगा कामांचे ‘सोशल ऑडिट’ करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण संचालनालयामार्फत जिल्हानिहाय ‘सोशल ऑडिट’चे वेळापत्रक तयार करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. या वेळापत्रकाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना