शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांतील ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:37 IST

आॅडिट’चा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षात विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, या ‘सोशल आॅडिट’चा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.शासनाच्या ग्रामविकास विभाग व सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले.त्यामध्ये तीनही तालुक्यांत ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांची पाहणी ग्राम साधन व्यक्तींच्या पथकांमार्फत करण्यात आली. तसेच करण्यात आलेल्या कामांच्या ‘रेकॉर्ड’ची तपासणी करण्यात आली. अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील १२० ग्रामपंचायती अंतर्गत ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, या सोशल आॅडिटचा अहवाल जिल्हा सामाजिक अंकेक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय, राज्य शासनाचे सामाजिक अंकेक्षण संचालनालय, ग्रामविकास विभाग व रोजगार हमी विभागाकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे.तपासणी अहवालावर घेतली जनसुनावणी!तीन तालुक्यांतील ‘नरेगा’ कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये करण्यात आलेल्या तपासणी अहवालावर ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान जनसुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये ११ सप्टेंबर रोजी पातूर, १२ सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर व १३ सप्टेंबर रोजी अकोला पंचायत समिती सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. तपासणी अहवालाचे वाचन करून संबंधित अधिकाºयांचे मत नोंदविण्यात आले. तसेच शेतकरी व लाभार्थींच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.‘आॅनलाइन’ माहितीद्वारे ‘आॅडिट’ पूर्ण!ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ‘नरेगा’ कामांच्या सोशल आॅडिटमध्ये ग्रामपंचायतींकडून कामांचे रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नरेगा कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आणि कामांची ‘आॅनलाइन’ माहिती घेत, त्या आधारे नरेगा कामांचे ‘सोशल आॅडिट’ पूर्ण करण्यात आले.

‘या’ कामांची करण्यात आली तपासणी!जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत नरेगा अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात आले. त्यामध्ये सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांची तपासणी करण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोला