शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्र बाळ काळणे कर्करुग्णांना देताहेत जगण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 14:30 IST

सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांनी कर्करोगालाही पळवून लावल्याच्या अभिनव संदेशाने व्याख्यानातील श्रोते भारावून जात आहेत.

अकोला : कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेले अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आता गत काही दिवसांपासून कर्करुग्णांना धीर देत कर्करोगासंदर्भात जाहीर जनजागृती करीत आहेत. वन्यजीवांशी दोन हात करणारे काळणे, कर्करोगाशी कसा संघर्ष करीत आहेत, याची उदाहरणे ते जनतेला देत आहेत. मराठवाड्याच्या बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड परिसरात पाच दिवसांत त्यांनी जनजागृतीपर ११ व्याख्याने केली.धावतो माझा मनोरथ मोडलेला, मी न झुंजीचा इरादा सोडलेला... दूरचे तारे जरी देतात हाका, राहतो मातीसवे मी जोडलेला... या गझलेच्या ओळीप्रमाणे बाळ काळणेंच्या आयुष्याचा प्रवास अलीकडे सुरू आहे. अकोल्यात कुठेही सर्प निघो, अकोलेकरांच्या तोंडून पहिले नाव बाळ काळणे यांचेच येते. सामाजिक बांधीलकीतून प्रकाशझोतात आलेल्या बाळ काळणेंना गतवर्षी गळ्याच्या कर्करोगाने ग्रासले; मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. काळणेंवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी आर्थिक आणि वैद्यकीय मदत करून त्यांचे प्राण वाचविले. काळणे कर्करोगासोबतचा लढा जिंकत असतानादेखील त्यांनी सर्प पकडण्याची लोकसेवा सुरूच ठेवली. दरम्यान, अमरावती येथील डॉ. अविनाश सावजींनी काळणे यांना कर्करोगाविषयीचे अनुभव लोकांना सांगण्यास प्रवृत्त केले. अत्यंत मार्मिक आणि हदयस्पर्शी होणारा काळणे यांचा संवाद जनजागृतीसाठी परिणामकारक ठरत असल्याचे त्यांना लोकांनी सांगितले. लोकांच्या भावनेची कदर करीत सर्पतज्ज्ञ काळणे यांनी कर्करुग्णांना धीर देत जगण्याच बळ देणं सुरू केलं. आता त्यांना राज्यातील विविध ठिकाणाहून व्याख्याने देण्यासाठी बोलाविले जात आहे. मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, विक्रीकर कार्यालयात त्यांची व्याख्याने झाली. बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड परिसरात सातत्याने व्याख्याने होत आहेत. पाच दिवसांत त्यांनी जवळपास ११ व्याख्याने केली. वाघ, माकड, अजगर, नाग आदी वन्य जीवांना न घाबरणाºया सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांनी कर्करोगालाही पळवून लावल्याच्या अभिनव संदेशाने व्याख्यानातील श्रोते भारावून जात आहेत. हजारो विषारी सर्पांना आतापर्यंत जीवनदान देत असताना मी कधी घाबरलो नाही. कर्करोगाने ग्रासल्यानंतर मी दररोज मृत्यू अनुभवत आहे. त्यामुळे पुढचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेतच घालविणार आहे.-बाळ काळणे, मानद वन्यजीव संरक्षक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक