शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ओपन स्पेस’वर शोषखड्ड्यांसाठी मुहूर्तच सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:11 IST

पावसाचे दिवस लक्षात घेता, ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तूर्तास या कामासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती.अद्यापपर्यंत मनपाने किती ओपन स्पेसवर शोषखड्डे तयार केले, याची माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता प्रशासनाने शोषखड्डे खोदण्यास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.

अकोला: शहराची भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी जलपुनर्भरणाची नितांत आवश्यकता आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी महापालिकेत कक्षाचे गठन करण्यासोबतच शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. पावसाचे दिवस लक्षात घेता, ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तूर्तास या कामासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे.भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. महान धरणात उपलब्ध असलेला जलसाठा व शहराच्या भूजल पातळीत घसरण झाल्यामुळे अकोलेकरांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. भूजल पातळीत वाढ करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग)करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच प्रत्यक्षात कृती करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत मध्यंतरी मनपाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नाल्यांद्वारे वाहून जात असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे शहराच्या भूजल पातळीत घसरण होत आहे. पाण्याचा बेसुमार उपसा व वापर होत असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनीच जागरूक होण्याची गरज आहे. अशा स्थितीत छतावरील पाण्याचे नियोजन करून ते बोअर किंवा विहिरीपर्यंत पोहोचविण्यासाठी जल पुनर्भरणाची नितांत आवश्यकता आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून शहरात ५० ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे शोषखड्डे तयार केले जातील. यादरम्यान, मनपा प्रशासनानेसुद्धा शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करणार असल्याचे स्पष्ट केले होते. अद्यापपर्यंत मनपाने किती ओपन स्पेसवर शोषखड्डे तयार केले, याची माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता प्रशासनाने शोषखड्डे खोदण्यास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.

जलपुनर्भरणाबद्दल संभ्रमछतावरील पाणी जमिनीत मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. छतावरील पाण्याचा शोषखड्डा बोअरजवळ करायचा का, घरापासून किती अंतरावर खड्डा खोदण्याची गरज आहे, खड्ड्यासाठी कोणते साहित्य वापरायचे आणि त्यासाठी लागणारा एकूण खर्च किती आदी प्रश्न पाहता नागरिक आखडता हात घेत असल्याचे चित्र आहे. यासाठी आता प्रभागातील नगरसेवकांनी समोर येऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना कुशल कामगार उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका