शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर विकास कामांना मंजुरी नाही; सत्तापक्षाचा ठराव संशयाच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 10:34 IST

२ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत असा कोणताही प्रस्ताव नसल्यामुळे या ठरावावर विरोधी पक्ष शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.

अकोला : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किंवा राज्य शासनामार्फत प्राप्त निधीतून मनपा क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी क्रमप्राप्त असल्याचा सत्ताधारी भाजपचा ठराव संशयाच्या घेºयात सापडला आहे. २ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत असा कोणताही प्रस्ताव नसल्यामुळे या ठरावावर विरोधी पक्ष शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी प्रशासनाच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत.महापालिकेच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे दिसून येत आहे. जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या सबबीखाली शहरात ऐन पावसाळ््यात रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. निकष-नियम धाब्यावर बसवित संबंधित कंत्राटदार अवघ्या दीड फूट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष शिवसेनेने सत्तापक्षावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. यादरम्यान, तत्कालीन भाजप सरकारने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये १५ कोटींचा मंजूर केलेला निधी नगर विकास विभागाने १७ जुुलै २०२० मध्ये शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील रखडलेल्या विकास कामांसाठी वळता केला. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून, याप्रकरणी आ. गोवर्धन शर्मा यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.निधी वळता केल्यानंतर सत्तापक्षाचा ठराव समोर आला आहे. २ जुलै २०२० रोजी जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी तसेच राज्य शासनाकडून मंजूर होणाºया निधीतील कामांसाठी सभागृहाची पूर्वसंमती आवश्यक राहील, असा ठराव प्रशासनाने मंजूर केला आहे. २ जुलै रोजीच्या सभेत वेळेवरच्या विषयांतही असा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्यामुळे प्रशासनाने मंजूर केलेल्या ठरावावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे.अडचणी वाढल्याने सभा गुंडाळली!४२ जुलै रोजीच्या सभेत काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद नौशाद, राकाँचे नगरसेवक अब्दुल रहीम यांनी हद्दवाढ क्षेत्रात समाविष्ट झालेल्या प्रभाग क्रमांक १ मध्ये तयार केलेल्या रस्त्याची अवघ्या तीन महिन्यांत चाळण झाल्याचा आरोप करीत सभागृह डोक्यावर घेतले होते.तसेच हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांच्या देयकांसाठी १४ व्या वित्त आयोगातून १३ कोटींचा निधी मंजूर करण्यावरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते. अडचणी वाढत असल्याचे पाहून सत्तापक्षाने सभा गुंडाळली होती. यावेळी अशा स्वरूपाचा प्रस्तावच पटलावर आला नव्हता, हे विशेष.

२ जुलै रोजीच्या सभेत वेळेवरच्या विषयांत सत्तापक्षाकडून असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने ठराव मंजूर केला.- अनिल बिडवे, नगर सचिव, मनपा

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला