शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 10:28 IST

सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर दुसरीकडे कोरोना बाधितांचा जिल्ह्यातील मृत्यूदर ही वाढत आहे. या वाढत्या मृत्यूदराला उशिरा रुग्णालयात दाखल होण्याची मानसिकताही कारणीभूत ठरत आहे. लवकर निदान झाले तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबु शकतात. गेल्या सात दिवसात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांंची हिस्ट्री तपासली असता, सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ही रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र काही प्रमाणात लक्षणे आढळल्यानंतरही काही रुग्ण कोरोनाच्या धास्तीमुळे उपचारासाठी उशिरा रुग्णालयात दाखल होतात. उपचार करण्यास डॉक्टरांना दोन-चार दिवसही मिळत नाही. अशाच रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्यासाठी लवकर निदान होणे आणि तातडीने उपचार सुरू होणे आवश्यक आहे. लक्षणे दिसताचक्षणी लगेच कोरोना चाचणी केली नाही तर संभाव्य धोका कमी होतो. केवळ कोरोनाच्या धास्तीमुळे घरीच बसणे जीवघेणे ठरू शकते. प्राथमिक लक्षणे आढळल्यावर चाचणीअंती रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना किमान पाच ते सहा दिवस उपचारासाठी मिळाले तरी मृत्यू रोखता येवू शकतात.प्राथमिक लक्षणे दिसून लागताच कोरोनाची चाचणी करुन घ्या. लवकर निदान झाल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास कोरोनाचा प्रभाव फुफ्फूसावर होतो. तेव्हा रुग्णाला वाचविणे मोठे जोखमिचे होते. लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करुन घेतली तर लवकर उपचार सुरु करता येईल.- डॉ. मिनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला