शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:22 IST

अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘

- संतोष येलकरअकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५ डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला.शेतकºयांच्या शेतमाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील शेतमालाची निर्यात करण्याकरिता शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून २१ कोटी रुपयांचा ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा मुंबईच्या आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला. त्यावेळी अकोट येथील नरनाळा शेतकरी कंपनीचे संचालक पंजाबराव बोचे व आयएनआय कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निर्यातीचा करार झाल्याने अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंबाची निर्यात युरोप व आखाती देशात करण्यात येणार आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्ह्याचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.पायाभूत सुविधा उपलब्ध होणार!शासनाच्या स्मार्ट प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतमाल निर्यातीसाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

भेंडी, मिरची निर्यातीचा करारही लवकरच!शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील मिरची, भेंडी व इतर भाजीपाला निर्यातीचा करारदेखील अकोल्याच्या मोर्णा व्हॅली कंपनीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील केळी, डाळिंबासह मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांचीही निर्यात होणार आहे. 

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंब निर्यातीचा करार मुंबईच्या आयएनआय कंपनीसोबत करण्यात करण्यात आला. स्मार्ट योजनेत जिल्हा समाविष्ट झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.-अशोक अमानकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेती