शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प

By atul.jaiswal | Updated: August 6, 2022 20:03 IST

Smart card registration of ST stopped : स्मार्ट कार्ड नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकावर दिसून येत आहे.

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर सवलतपात्र प्रवाशांना स्मार्ट कार्ड बाळगणे येत्या ३१ ऑगस्टपासून बंधनकारक होणार असल्याच्या पृष्ठभूमीवर स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांची लगबग सुरु झाली असतानाच गत तीन आठवड्यांपासून नोंदणी प्रक्रिया बंद झाली आहे. राज्यपातळीवर सर्व्हर ठप्प झाल्याने स्मार्ट कार्ड नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकावर दिसून येत आहे.

गत दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु हजारो सवलतधारकांनी नव्या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झालेले नाहीत. परिणामी, सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढ मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच गत १५ ते २० दिवसांपासून स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया बंद पडली आहे. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी बंद असल्याचा फलकच मध्यवर्ती बसस्थानकावरील कक्षाच्या खिडकीवर लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर आगरांमध्येही नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकांवर नाहक येरझारा घालाव्या लागत असल्याचे चित्र आहे.

स्मार्ट कार्ड वितरण मात्र सुरू

यापूर्वी नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतपात्र प्रवाशांचे स्मार्ट कार्ड त्या त्या आगारांमध्ये प्राप्त झाले आहेत. हे स्मार्ट कार्ड वितरित करण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे. ज्यांनी आधी नोंदणी केलेली आहे, त्यांनी स्मार्ट कार्ड घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

३१ ऑगस्टपर्यंत मुदत

स्मार्टकार्ड नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रचलित ओळखपत्रांवर प्रवास करण्याची मुभा आहे. त्यानंतर मात्र स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. नोंदणी प्रक्रिया ठप्प असल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड अभावी या सवलतीचा लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तथापि, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया अव्याहतपणे सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला