शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

छोटीशी चूकही ठेवू शकते वैद्यकीय प्रवेशापासून वंचित -  डॉ. प्रविण शिंगारे  

By atul.jaiswal | Updated: June 2, 2018 15:19 IST

अकोला : वैद्यकीय प्रवेश प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू शकते, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांनी वैद्यकीय प्रवेश परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यावतीने येथील प्रमिलाताई ओक सभागृहात विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.डॉ. शिंगारे यांनी यावेळी वैद्यकीय प्रवेशाचा इतिहास उलगडताना एनईईटी परिक्षा संदर्भात स्पष्टीकरण दिले. फॉर्म व्यवस्थित वाचून तो भरल्यानंतर इतरांना दाखवा, त्यातील चुकांची दुरुस्ती करुनच फॉर्म सबमिट करावा, असेही शिंगारे यांनी सांगितले.

अकोला : वैद्यकीय प्रवेश प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवू शकते, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांनी वैद्यकीय प्रवेश परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  शनिवारी येथे केले.एनईईटी (निट)परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकरीता व एमबीबीएस,बीडीएस, ओटी, पीटीसाठी प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यावतीने  शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. अपर्णा पाटील, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , डॉ. राजेश कार्यकर्ते, माजी महापौर उज्वला देशमुख, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी नगराध्यक्ष हरिश अलिमचंदाणी, डॉ. अशोक ओळंबे, गोपी ठाकरे,आशिष पवित्रकार उपस्थित होते.डॉ. शिंगारे यांनी यावेळी वैद्यकीय प्रवेशाचा इतिहास उलगडताना एनईईटी परिक्षा संदर्भात स्पष्टीकरण दिले. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर ही परिक्षा घेण्यात येते. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाकरीता राष्ट्रीय पातळीवर १५ टक्के तर राज्यासाठी ८५ टक्के जागा असतात, असे शिंगारे यांनी सांगितले. सदर परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जागरुकपणे फॉर्म भरावा. अत्यंत पारदर्शक पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांनी फॉर्म काळजीपूर्वक भरावा. छोटीशी चूकसुध्दा प्रवेशापासून वंचित ठेवू शकते. महाविद्यालयाची निवड करीत असताना त्या महाविद्यालयाचा कोड व्यवस्थित भरा. आरक्षण, किती जागा आहेत, शुल्क किती याची माहिती घ्या. फॉर्म व्यवस्थित वाचून तो भरल्यानंतर इतरांना दाखवा, त्यातील चुकांची दुरुस्ती करुनच फॉर्म सबमिट करावा, असेही शिंगारे यांनी सांगितले. यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना दोन मिनीट शांतता ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर्स, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पालक व विद्यार्थी या शिबीराला उपस्थित होते.डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक - डॉ. रणजीत पाटीलपालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी या मार्गदर्शन शिबीराचे महत्त्व विषद करताना सांगितले की, आपला पाल्य डॉक्टर व्हावा, हे अनेक पालकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. एनईईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, यासाठी हे शिबीर आवश्यक आहे. या शिबीराचा निश्चितच पालकांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPramilatai Oke Hallप्रमिलाताई ओक हॉलStudentविद्यार्थी