शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांसाठी आता मोजावे लागताहेत हेक्‍टरी सोळाशे रुपये अधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संतोषकुमार गवई पातूर: रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तालुक्यात सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संतोषकुमार गवई

पातूर: रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तालुक्यात सध्या उन्हाळी पिकांची पेरणी जास्त आहे. पिकांना खते देण्याचे काम सुरू असून, आता शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी हेक्टरी सोळाशे रुपये अधिक मोजावे लागत आहेत. नवीन रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. खरीप हंगाम अवघ्या काही महिन्यावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.

तालुक्यात उन्हाळी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा, भूईमूग, उन्हाळी सोयाबीन, मूग आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र, आता रासायनिक खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमती सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही पिकासाठी हेक्‍टरी आठ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता झालेल्या पिकाचा दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आधीच शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचा ही मोठा फटका बसत आहे.

------------------------------------------

शेणखत मिळणे दुरापास्त!

पूर्वी शेतकरी आपल्या शेतात शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु, अलीकडे शेणखत मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करून शेतात टाकतात. पिकाला योग्य अशी खताची मात्रा दिली नाही, तर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे रासायनिक खतांचे दर गगनाला भिडत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना पिकांकरिता ते खरेदी करणे भाग आहे.

----------------------------------------------

शेतकऱ्यांना इंधनाचा दरवाढीचा फटका

डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने ट्रॅक्टरची मशागत महागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुन्हा बैलांच्या मदतीने मशागत करावी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

-----------------------------------------------------------------------------

खतांच्या दरवाढीमुळे लागवडी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन न झाल्यास शेती तोट्याची होणार आहे. शासनाने खतांची दरवाढ त्वरित मागे घ्यावी.

-दीपक इंगळे, शेतकरी, भंडारज बु.

---------------------------------------------------------------------------

मंडळनिहाय पिकांची पेरणी

मंडळाचे नाव भूईमूग मका टरबूज काकडी फुलवर्गीय पिके इतर पिके

पातूर २३१ ३५ ४ ० ६३ १६८

बाभूळगाव ५३१ ९ ० ० ० २

आलेगाव ४१० ८ ६ ० ० ४७

चान्नी ६३१ ३९ १०२ २ ६ १५१

सस्ती २७५ ५१.२ २१ ८.२ ० ४७