शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सहा पंचायत समित्यांचे बीडीओ जिल्ह्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:03 IST

अकोला : ग्रामविकास विभागाने गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला. ...

अकोला: ग्रामविकास विभागाने गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन गटविकास अधिकाऱ्यांची बदली केली असून, त्यांच्या जागेवर कोणालाही दिले नाही. त्यामुळे आता सहा पंचायत समित्या गटविकास अधिकाºयांशिवाय राहणार आहेत. हा प्रकार जिल्ह्याच्या प्रशासनात खीळ घालण्यासारखा आहे.जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या रिक्त पदांची संख्या प्रचंड आहे. विशेष म्हणजे, अकोल्यातून बदली होणाºया अधिकाºयांच्या जागेवर कुणालाही दिले जात नाही. त्यामुळे काही अधिकाºयांची पदे वर्षानुवर्ष रिक्त ठेवण्याचा उपक्रमही सातत्याने शासनाकडून राबवला जात असल्याचेही पाहावयास मिळते.काही दिवसांपूर्वी तेल्हारा, बाळापूर पंचायत समिती गटविकास अधिकाºयांची बदली झाली. त्यांच्या जागेवर इतर अधिकाºयाला पदस्थापना मिळालेली नाही. या दोन्ही पंचायत समित्या प्रभारींच्या खांद्यावर आहेत. त्यातच ग्रामविकास विभागाने ३ आॅगस्ट रोजीच्या आदेशाने ३५ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी एस.बी. भंडारे यांची कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी येथे, पातूरच्या गटविकास अधिकारी पी.एस. खोचरे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, अकोटचे गटविकास अधिकारी बी.एस. पाचपाटील यांची कोरपणा पंचायत समितीमध्ये बदली केली आहे. मूर्तिजापूरचे गटविकास अधिकारी अगर्ते यांचीही यापूर्वीच बदली झाली आहे. या सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची बदली केल्यानंतर त्या ठिकाणी एकही अधिकारी न देण्याचा उपक्रम शासनाकडून राबवण्यात आला आहे.विशेष म्हणजे, लगतच्या काळात अकोल्याचे गटविकास अधिकारी राहुल शेळके यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीनंतर त्यांचीही बदली होऊ शकते. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कारभार अधिकाºयांविना वाºयावर सोडला जाण्याची शक्यता या प्रकारातून स्पष्ट होत आहे. - जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.व्ही. गोहाड यांची बदली करण्यात आली. राज्यातील १५० पेक्षाही अधिक अधिकाºयांपैकी केवळ एकाला अकोल्यात देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpanchayat samitiपंचायत समिती