शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
5
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
6
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
7
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
8
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
9
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
10
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
11
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
12
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
13
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
14
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
15
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
16
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
17
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
18
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
19
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
20
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

सहा दिवसाचा जनता कर्फ्यू आता ‘स्वयंस्फूर्त’; शासनाने दिली नाही मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:03 IST

स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रविवारी केले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रविवारी केले.दरम्यान, शहरात १ ते ६ जून या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला; मात्र ३१ मे रोजी सायंकाळपर्यंत या प्रस्तावाला मुख्य सचिवांकडून मान्यता प्राप्त झाली नाही.अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करणे अवघड होणार आहे. त्यानुषंगाने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यावर एकमत झाले होते. त्यानुसार १ ते ६ जून या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे व आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी केले. असे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

स्वयंस्फूर्तीने 'जनता कर्फ्यू'मध्ये सहभागी व्हा -जिल्हाधिकारीपालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय बैठकीत १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील नागरिकांनी घराबाहेर न पडता , 'जनता कर्फ्यू ' मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले. दरम्यान, अकोला शहरासाठी २१ मे रोजी काढण्यात आलेल आदेश कायम ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वंचित आघाडीचा ‘जनता कर्फ्यू’ला विरोधपालकमंत्री यांनी १ ते ६ जूनपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध असल्याचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, २८ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीत जनता कर्फ्यूच्या प्रस्तावास विरोध केला होता. आधी गरीब आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची जेवणाची व्यवस्था करावी तसेच वाढीव चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि संस्थात्मक विलगीकरण, रुग्णांच्या वॉर्डमध्ये उत्तम उपचार आणि इतर व्यवस्था करावी, पीके व्हीमध्ये रुग्णांचे हाल थांबवावे, अशा सूचना केल्या होत्या; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. जनता कर्फ्यूने काहीही साध्य होणार नाही. राज्य सरकारने अकोला प्रशासनास तोंडावर पाडले असल्याचे आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याBacchu Kaduबच्चू कडू