शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एकरी उत्पादन पोहोचले ८.४ क्विंटलवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:50 IST

देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्विंटल एवढा उतारा आला आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीटीचे हे देशी वाण विकसित केल्यानंतर प्रथमच यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेण्यात येत आहे. 

ठळक मुद्देदेशी बीटी कापूस : डॉ. पंदेकृविचे संशोधन१२ क्विंटल उत्पादनाची शक्यता!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्विंटल एवढा उतारा आला आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीटीचे हे देशी वाण विकसित केल्यानंतर प्रथमच यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्‍चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची जून महिन्यात पेरणी करण्यात आली होती.  कपाशीच्या या झाडांना भरघोस कापूस आला आहे; पण पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम यावर्षी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर्षी पाणीच उपलब्ध नसल्याने जेमतेम पाण्यावर ही चाचणी घेण्यात आली असून, आतापर्यंतच्या एका एकरात दोन वेचण्या पूर्ण झाल्या असून, ८.४  क्विंटल उत्पादन झाले आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस होणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नियमित वेचणीसह फरदडचा कापूसही निघण्याची शक्यता आहे.

एक एकर क्षेत्रावर बीटी कापसाची चाचणी!मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या पश्‍चिम विभागाच्या क्षेत्रावर एक एकर क्षेत्रावर बीटी कपाशीची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये कोरडवाहू आणि ओलीत अशा दोन प्रकारच्या बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. एकरी १२ क्विंटल उत्पादन म्हटले, तरी हे चांगले उत्पादन मानले जात आहे. वेळेवर पाऊस आला असता, तर हे उत्पादन अधिक झाले असते, असा दावाही कृषी शास्त्रज्ञांनी केला.

आतापर्यंत जिराईत व ओलिताच्या एका एकर क्षेत्रात ८.४ क्विंटल देशी बीटी कापसाचे उत्पादन झाले आहे. आणखी चार ते पाच क्विंटल उत्पादन होईल. पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम झाला आहे, अन्यथा १५ क्विंटलच्यावर उत्पादनाची शक्यता होती.- शंकरराव देशमुख,विभाग प्रमुख, पश्‍चिम संशोधन प्रक्षेत्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.--

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती