शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजारावर सिंचन विहिरींची कामे रखडली

By admin | Updated: November 13, 2014 23:43 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढणार कसे?

संतोष येलकर/अकोलाधडक सिंचन विहिर योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असला तरी; अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि वर्धा, अशा एकूण जिल्ह्यांमध्ये १६ हजार ३७८ सिंचन विहिरींची कामे अद्याप सुरुच झाली नाहीत. हजारो सिंचन विहिरींची कामे बाकी असताना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढणार कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सन २00९ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहिर योजना सुरु करण्यात आली. या सहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात १ हजार ३00 सिंचन विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रूपयांचा निधीदेखिल उपलब्ध करुन देण्यात आला; मात्र गेल्या पाच वर्षात धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले नाही. दरम्यान, धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत रखडलेल्या विहिरींपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पभुधारक शेतकरी लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरींचा समावेश गत फेब्रुवारीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आला. सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत प्रत्येकी २ लाख ५0 हजार रूपये, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येकी ३ लाखांचे अनुदान दिले जाते. सिंचन विहिरींच्या कामांसाठी निधीची कमतरता नसतानाही, शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत ३ हजार ३२६ आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १३ हजार ५२ सिंचन विहिरींची कामे प्रलंबीत होती. कामाची हिच स्थिती राहीली तर, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी शासनामार्फत धडक सिंचन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा कार्यक्रम विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहे. सिंचन विहिरींची प्रलंबित असलेली कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे रोजगारहमी योजनेचे विभागीय उपायुक्त एस.टी.टाकसाळे यांनी स्पष्ट केले. योजना व जिल्हानिहाय प्रलंबित सिंचन विहिरींची कामे!जिल्हा            धडक सिंचन योजना             मग्रारोहयो अमरावती            ५५0                                   ३७३३अकोला               ३१५                                    २४३९यवतमाळ          १८१९                                     ३१५५बुलडाणा              ११0                                     २४३२वाशिम                 ४१६                                     १२९३वर्धा                     ११६                                     ११६0.......................................एकूण                   ३३२६                                   १३0५२