शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

विदर्भात फुलतेय रेशीम शेती; ५ हजार एकरवर तुतीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:48 IST

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, विदर्भ,वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे.

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, विदर्भ,वºहाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला वºहाडात चांगल्यापैकी जम बसविणाºया या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणाºया तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून,पश्चिम (वºहाड)विदर्भात पाच हजार एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, रेशीम शेतीसाठी बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.नवीन तुती लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी अकोला जिल्ह्यात १८० एकर तुती लागवड करण्यात आली आहे. पातूर व बाळापूर तालुक्यात मर्यादित असलेले तुतीचे क्षेत्र यावर्षी वाढले आहे. अकोला आणि आकोट तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी तुती लागवड सुरू केली होती तथापि पावसाच्या अनिश्चिततेमुळे पातूर तालुक्यात कोषाचे प्लॉट वाढले नाहीत. त्यामुळे रेशीम अधिकाºयांकडून याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जात असून, कीटक संगोपन व गृह बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च अपेक्षित असल्याने यासाठी अनुदान देण्यात आले आहे.वºहाडातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी ही कमी खर्चाची शेती करावी, यासाठी अमरावती विभागीय रेशीम शेती कार्यालयातर्फे शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात असून, यासाठी या भागातील शेतकºयांचे अभ्यास दौरेही करण्यात आले आहेत.

भरघोस उत्पादन देणारी शेतीनिसर्गात पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. यापासून निर्माण होणारा रेशीम धागा अतिशय लोकप्रिय असून, त्याला मिळणारी किंमतही भरपूर असल्याने शेतकºयांनी रेशीम उत्पादनाकडे वळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. कमी खर्चाचा हा जोडधंदा असल्याने शेतकरी या शेतीकडे वळला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती