शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

अकोला शहरात सिमेंट रस्त्यांची चाळण; अकाेलेकरांच्या जीवाचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 10:47 IST

Akola News ; रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे ठरले असूून खड्ड्यातून मार्ग काढताना अकाेलेकरांच्या जीवाचे हाल हाेत आहेत.

- आशिष गावंडे

अकोला :  शहरात २०१६ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांचे पितळ अवघ्या सहा महिन्यांत उघडे पडले. हे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे ठरले असूून खड्ड्यातून मार्ग काढताना अकाेलेकरांच्या जीवाचे हाल हाेत असताना लाेकप्रतिनिधी व सर्वपक्षीय नगरसेवकांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. यादरम्यान, चार सिमेंट रस्त्यांची तपासणी करणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या अहवालाकडे मनपा प्रशासनाने साफ कानाडाेळा केल्याने भ्रष्ट यंत्रणेला पाठीशी घातले जात असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेला सन २०१२-१३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्राप्त निधीतून डांबरीकरणाचे १८ रस्ते प्रस्तावित केले होते. दरम्यान, तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करून अठरा फूट रुंद रस्ते चाळीस फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापैकी सहा प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी शासनाकडून घेण्यात आला. स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला सिमेंट रस्त्यांची कामे देण्यात आली. २०१६ मध्ये ही कामे सुरू केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे पडले. रस्ता तयार झाल्यानंतर लगेच ठिकठिकाणी भेगा पडून तडे गेले. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले.

 

चौकशी केली; अहवाल धूळखात

तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या अहवालावर कारवाई न करता तत्कालीन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’मार्फत रस्त्यांची पुन्हा चाैकशी करण्याचा निर्णय घेतला. ‘व्हीएनआयटी’च्या वतीने प्रा. फैसल व त्यांच्या चमूने चार रस्त्यांचे एकूण ३९ नमुने घेतले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये रस्त्याच्या निर्माण कार्याविषयी चौकशी केली. याचा अहवाल ‘व्हीएनआयटी’कडे धूळखात पडला असून, मनपाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

 

‘ऑडिट’मध्ये रस्ते निकृष्ट दर्जाचे

शहरातील सहा रस्त्यांपैकी चार सिमेंट रस्ते मनपाच्या वतीने व उर्वरित दोन रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आले. या सर्व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ‘ऑडिट’मध्ये उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सिमेंट रस्त्यांची तपासणी करून चौकशी अहवाल मनपाकडे सादर केला होता, हे विशेष.

 

२०१६ पासून शहरात तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ३० वर्षांचे आयुर्मान असलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यांतच खड्डे पडले आहेत. यामुळे अकाेलेकरांना प्रचंड वेदना हाेत आहेत.

- रवि शिंदे, समाजसेवक

 

खड्ड्यांमुळे शहरातील सिमेंट रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे नागरिकांना पाठीचे मणके व हाडांचे विविध आजार जडत आहेत. नरक यातना आणखी किती वर्ष सहन करायच्या, असा सवाल असून यावर लाेकप्रतिनिधी व मनपाने खुलासा करावा.

- अभिषेक खरसाडे, नागरिक

 

माेठा गवगवा करून राजकारण्यांनी सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन केले. आता त्यावर खड्डे पडले असताना सर्वांनी चुप्पी साधली आहे. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांचे हाल हाेत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत.

- प्रवीण शिंदे, नागरिक

 

मनपा व ‘पीडब्ल्यूडी’मार्फत तयार करण्यात आलेले शहरातील सर्व सिमेंट रस्ते निकृष्ट दर्जाचे ठरले आहेत. रस्त्यांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणाऱ्या लाेकप्रतिनिधींनी का चुप्पी साधली, हा संशाेधनाचा विषय आहे. खिसे जड करण्याच्या नादात अकाेलेकरांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

- पराग गवई पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहर