शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ‘एसबीआय’ला घेराव

By admin | Updated: May 17, 2017 14:58 IST

शेतकर्‍यांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला.

अकोला:शेतकर्‍यांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ह्यएसबीआयह्णचे विभागीय व्यवस्थापक मुंकूद उपासने यांना शेतकर्‍यांचे हक्काचे पैसे तातडीने द्या,अन्यथा बँकेचे कामकाज बंद पाडू असा सज्जड दम भरताच विभागीय व्यवस्थापकांनी क्षणाचाही विलंब न करता शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना पैसे देण्याचे निर्देश जारी केले.शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असली तरी शेतात काम करणार्‍या मजूरांना पैसे देण्यासाठी शेतकर्‍यांचे खिसे रिकामेच असल्याची परिस्थिती आहे. तूर खरेदीसाठी नाफेडने आखडता हात घेतल्यामुळे शेतकर्‍यांच्या घरात हजारो क्विंटल तूर पडून आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ज्या शेतकर्‍यांनी २७00 रूपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन आणि नाफेडकडे तूर विक्री केली, त्यांचे पैसे बँकेत जमा झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाभरातील शाखांमधून आवश्यकतेनुसार पैसे दिले जात नसल्यामुळे शेतकर्‍यांसमोर भलतेच संकट उभे ठाकले आहे. शेतीची मशागत केल्यानंतर मजूरांचे पैसे देण्यास शेतकर्‍यांजवळ पैसाच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. बँकेक डे गरजेनुसार २५-३0 हजार रूपयांची मागणी केली असता केवळ ३ हजार किंवा ५ हजार रूपये शेतकर्‍यांच्या हातावर टिकवून त्यांची बोळवण केली जात आहे. शेतकर्‍यांप्रति बँकांच्या उदासिन आणि निष्क्रीय धोरणामुळे जिल्हाभरातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकर्‍यांनी ही कैफियत शिवसेनेकडे मांडल्यानंतर बुधवारी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात ह्यस्टेट बँक ऑफ इंडियाह्णच्या मुख्य शाखेवर हल्लाबोल करण्यात आला. मुख्य शाखेचे विभागीय व्यवस्थापक मुकूंद उपासने यांना घेराव घालून कोणाच्या आदेशानुसार शेतकर्‍यांना कमी रक्कम देण्यात येत आहे,अशी जिल्हाप्रमुख देशमुख यांनी विचारणा केल्यानंतर अशा प्रकारचे कोणाचेही आदेश नसल्याचे विभागीय व्यवस्थापकांनी सांगितले. शेतकर्‍यांची अडवणूक करणे बंद करा, अन्यथा या क्षणापासूनच बँकेचे कामकाज बंद पाडू असा दम जिल्हाप्रमुखांनी भरताच विभागीय व्यवस्थापक उपासने यांनी जिल्हाभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला पत्र लिहून शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना पैसे अदा करण्याचे निर्देश दिले.