शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प!

By रवी दामोदर | Updated: February 26, 2024 19:43 IST

सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. दरम्यान व्यवहार बंद असल्याने जवळपास १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे.

अकोला : महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न पणन अधिनियममध्ये प्रस्तावित केलेल्या विधायेकातील सुधारणा शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी व इतर बाजार घटक तसेच बाजार समित्यांच्या अस्तित्वास बाधक ठरणार असल्याचे सांगत बाजार समितीमधील कामगारांनी सोमवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी कामकाज बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रतिसाद दिसून आला असून, सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. दरम्यान व्यवहार बंद असल्याने जवळपास १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत. प्रस्तावित विधेयकातील सुधारणा या शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी व इतर बाजार घटक तसेच बाजार समित्यांचे अस्तित्वास बाधक ठरणार असल्याने बाजार समितीमधील कामगारांनी सोमवारी कामकाज बंद ठेवणार असल्याचे निवेदन बाजार समितीला दिले होते.

शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीतसोमवारच्या एका दिवसाच्या बंदमुळे बाजार समितीत शेतमाल आला नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. व्यापाऱ्यांचे गाळे बंद होते. फक्त बाजार समिती आवारात यापूर्वी आलेला शेतमाल ठेवलेला दिसत होता. या बंदमुळे शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीत. दरम्यान, तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने अकोला बाजार समितीत एका दिवसापूर्वी आलेल्या तूरीचे माप झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अकोट व मूर्तिजापूर बाजार समितीतील व्यवहार ठप्प होते.

टॅग्स :Akolaअकोला